Shame on Bangladesh! बांगलादेशातील हिंदूंवर त्याचार, अमेरिकेत निदर्शने; हिंदू राष्ट्राची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:45 PM2024-12-11T14:45:58+5:302024-12-11T14:48:06+5:30
Shame on Bangladesh, Hindu protest in USA: अमेरिकेत लोकांनी रस्त्यावर उतरून बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला
Shame on Bangladesh, Hindu protest in USA: बांगलादेशातीलहिंदूंवरील अत्याचाराचा निषेध आता केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नसून तो संपूर्ण जगात दिसू लागला आहे. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातीलहिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. तशातच केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही या अत्याचाराविरोधात आवाज उठू लागला आहे. अमेरिकेत लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध आणि निदर्शने केली.
शिकागो येथील कोरोलरी स्ट्रीम, इलिनॉय येथील राणा रेगन सेंटर येथे सुमारे ५०० भारतीय अमेरिकन हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शांततापूर्ण निदर्शने केली. याच आंदोलक गटाने दोन महिन्यांपूर्वी हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात शांततापूर्ण रॅलीही काढली होती. शिकागोच्या 'इंडियन सीनियर्स'चे अध्यक्ष हरिभाई पटेल यांनी या कार्यक्रमात बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरे कशी नष्ट केली जात आहेत आणि हिंदूंवर कसे अत्याचार केले जात आहेत, ते सांगितले. शिकागो काली बारी येथील डॉ. राम चक्रवर्ती यांनी बांगलादेशातील हिंदूंची सद्यस्थिती सांगितली. लष्कर आणि पोलिसही तरुण मुली आणि मुलांना उचलून बळजबरीने धर्मांतर करत आहेत. प्रत्येक वेळी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आम्हाला हिंदूंना 'हिंदू देश' हवा आहे, अशी मागणीही त्यांनी केली.
एफआयएच्या डॉ. रश्मी पटेल म्हणाल्या की, आम्ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना संदेश पाठवून सांगू की बांगलादेशात सुरू असलेला हा सर्वात मोठा हिंदू नरसंहार आहे. अमेरिकेतील हिंदूंनी या विषयावर आपल्या सिनेटर्सशी संपर्क साधावा. याशिवाय प्रख्यात डॉक्टर भरत बारई म्हणाले की, १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या १२ टक्के होती, ती आता २ ते ३ टक्क्यांवर आली आहे. बांगलादेशात हिंदू ३३ टक्के होते, ते आता ६ टक्क्यांवर आले आहे. एकतर त्यांची हत्या केली जात आहे किंवा त्यांचे धर्मांतर केले जात आहे आणि इतर कारणांचीही चौकशी व्हायला हवी. मात्र, ही आकडेवारी देताना त्यांनी कोणत्याही अहवालाचा हवाला दिलेला नाही.