निर्लज्जपणाचा कळस! जगाची झोप उडवून वूहानमधील नाइट क्लब जोरात सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:06 IST2020-09-22T07:06:00+5:302020-09-22T07:06:15+5:30
कोरोनाच्या उगमस्थानी रोज पार्ट्या : ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग

निर्लज्जपणाचा कळस! जगाची झोप उडवून वूहानमधील नाइट क्लब जोरात सुरू
बीजिंग : चीनमधील ज्या शहरातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जगभरात झाला, त्या वूहानमध्ये आता शाळा आणि महाविद्यालयेच काय नाइटलाइफही सुरू झाले आहे. तिथे रोज पार्ट्याही होत आहेत. वूहानमधून कोरोना विषाणू नष्ट झाला आहे, असा चीनचा दावा आहे.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग खूपच कमी झाला आहे. गेल्या ३३ दिवसांत वूहान शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असे चीनच्या सरकारचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
वूहान शहरातील सर्व नाइट क्लबही सुरू झाले असून, तिथे पूर्वीप्रमाणे प्रचंड गर्दी होत आहे. क्लबमध्ये येणाऱ्या तरुण-तरुणींच्या तोंडावर मास्क तर नसतातच आणि फिजिकल डिस्टन्सिंगही कोणीही पाळत नाही.
वेट मार्केटही सुरू :
वूहानच्या वेट मार्केट (मांसाहारी प्रकार मिळणारी बाजारपेठ) मधून या विषाणूंचा फैलाव झाला, असे आजही सांगण्यात येते. मात्र ते मार्केटही कधीच सुरू झाले आहे.