पहिल्यांदाच जगासमोर आली ISIS दहशतवाद्याची बायको; ‘जिहाद’बाबत मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 06:17 PM2021-09-15T18:17:57+5:302021-09-15T18:19:26+5:30

द सन रिपोर्टनुसार, शमीमा बेगम ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी २०१४ मध्ये ब्रिटन सोडून सीरियाला पोहचली होती

Shamima Begum The wife of an ISIS terrorist first came to the world; Big revelation about ‘jihad’ | पहिल्यांदाच जगासमोर आली ISIS दहशतवाद्याची बायको; ‘जिहाद’बाबत मोठा खुलासा

पहिल्यांदाच जगासमोर आली ISIS दहशतवाद्याची बायको; ‘जिहाद’बाबत मोठा खुलासा

Next
ठळक मुद्देISIS दहशतवाद्यांनी सीरिया आणि इराकच्या काही भागांवर कब्जा करुन मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांना ठार केले आहे.सीरिया-इराकमधून ISIS च्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाअमेरिका आणि रशियासह अन्य देशांनी सीरिया-इराकमध्ये दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केले.

सीरिया – जेहादमध्ये सहभागी होण्यासाठी १५ वर्षाची असताना सीरियाला गेलेली ISIS च्या दहशतवाद्याची बायको शमीमा बेगम पुन्हा एकदा मायदेशी परतण्याच्या तयारीत आहे. जिहादींनी तिला फूस लावल्याचा दावा तिने केलाय. ज्यामुळे तिने देश सोडण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता. परंतु आता तिला तिच्या मायदेशी पुन्हा परतायचं असल्याचं ती सांगत आहे.

१५ वर्षाची असताना बनली जिहादी

द सन रिपोर्टनुसार, शमीमा बेगम ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी २०१४ मध्ये ब्रिटन सोडून सीरियाला पोहचली होती. त्यावेळी तिचं वय केवळ १५ वर्ष होतं. त्याठिकाणी जाऊन शमीमानं ISIS च्या एका दहशतवाद्याशी लग्न केले. त्याच्यासोबतच ती जिहादमध्ये सहभागी झाली. लग्नानंतर तिला २ मुलं झाली. ISIS दहशतवाद्यांनी सीरिया आणि इराकच्या काही भागांवर कब्जा करुन मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांना ठार केले आहे. त्यानंतर अमेरिका आणि रशियासह अन्य देशांनी सीरिया-इराकमध्ये दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केले.

या मोहिमेत अनेक बडे दहशतवादी मारले गेले. त्यात शमीमा बेगमचा (Shamima Begum)  दहशतवादी नवराही सहभागी होता. सीरिया-इराकमधून ISIS च्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर आता शमीम बेगम पुन्हा बिटनमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली. याची भनक लागताच ब्रिटीश सरकारने फेब्रुवारी २०१९ रोजी आदेश जारी करत तिचं नागरिकत्व रद्द केले. तसेच तिला कधीही देशात घुसू देणार नाही असं म्हटलं. त्यानंतर आता शमीमा बेगम सीरियातील रिफ्यूज कॅम्पमध्ये राहत होती.

दहशतवाद्यांनी मला भडकवलं होतं

ब्रिटनमध्ये एका लाईव्ह टेलिकास्टमध्ये शमीमने स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा करत आहे. मी त्यावेळी खूप छोटी होते मला दहशतवाद्यांनी फूस लावली होती. त्यामुळे ती देश सोडून सीरियात राहायला आली. आता मी मरेन पण पुन्हा ISIS मध्ये जाणार नाही असं शमीमा बेगम म्हणते. मी कधीही जिहादमध्ये भाग घेतला नाही. केवळ माझ्या लहान मुलांचा सांभाळ आणि पत्नीची जबाबदारी सांभाळत होते. ब्रिटनमध्ये राहून मी चांगली मुसलमान बनू शकली नाही. त्यासाठी जिहादमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाला आले.

ब्रिटन सोडताना तिने विचार केला की, ISIS च्या एका व्यक्तीशी लग्न करावं. त्यानंतर मुलं जन्माला घालून पूर्ण आयुष्य इस्लामिक जीवन जगावं. परंतु सीरियात येऊन माझं आयुष्य इतकं बदलेल वाटलं नव्हतं. मला ब्रिटनमध्ये येण्याची संधी द्यायला हवी. मग मी सरकारसोबत जिहादी आणि दहशतवाद्यांविरोधात लढण्यास तयार आहे. दहशतवादी कशाप्रकारे युवकांना जाळ्यात ओढण्यासाठी इंटरनेटवर टूल बनवतात हे मी सांगू शकते. ब्रिटीश सरकारसाठी कुठलाही धोका नसून त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. दहशतवाद्यांविरोधात मी सरकारची साथ देईन. जिहादच्या नावाखाली दहशतवाद्यांनी ज्या लोकांची हत्या केली त्यांची माफी मागते. धर्माच्या नावाखाली हत्या करणं कुठल्याही स्थितीत योग्य ठरत नाही असं शमीमानं सांगितले आहे.  

Web Title: Shamima Begum The wife of an ISIS terrorist first came to the world; Big revelation about ‘jihad’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.