शारापोव्हाला दिलासा ?, 'वाडा'चा यू-टर्न
By admin | Published: April 13, 2016 11:16 PM2016-04-13T23:16:04+5:302016-04-13T23:16:04+5:30
वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा)नं यंदाच्या 1 मार्चपर्यंत मेल्डोनियम ड्रग्जबाबतच्या घेतलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्यांना रिओ दी जनेरिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. १३- वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी (वाडा)नं यंदाच्या 1 मार्चपर्यंत मेल्डोनियम ड्रग्जबाबतच्या घेतलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्यांना रिओ दी जनेरिओ ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरवलं आहे. वाडानं नेमून दिलेल्या मात्रेच्या वर मेल्डोनियम ड्रग्जचं सेवन केल्यास त्या खेळाडूंवर बंदी येणार आहे.
वाडा या एजन्सीनं 1 जानेवारी 2016लाच मेल्डोनियम ड्रग्जवर बंदी घातली होती. 2015पासूनच या ड्रग्जवर बंदी येणार असल्याचं खेळाडूंना आधीच माहिती होतं. तरीही खेळाडू या ड्रग्जचं सेवन करत होते. रशियन क्रीडा मंत्र्यांच्या मते, आतापर्यंत मारिया शारापोव्हा आणि जलतरणपटू युलिया इफिमोव्हासह 40 रशियन क्रीडापटू आणि महिलांची मेल्डोनियम ड्रग्ज सेवनासंबंधीची चाचणी घेण्यात आली होती. चाचणीत त्यांनी ड्रग्ज सेवन केल्याचं निष्पन्नही झालं होतं.
रशियाच्या क्रीडा मंत्र्यांनी वाडा या संस्थेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. वाडानं या ड्रग्जला निष्क्रिय करण्यासाठी आधी प्रयत्न केले होते. मात्र ते अपयशी ठरले. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या पॅव्हेल कुलिझनिकोव्ह आणि 2014च्या ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणारे सेमन एलिसस्ट्रेटोव्ह यांनी मेल्डोनियम ड्रग्ज सेवन केल्याचं चाचणीनंतर सिद्ध झालं होतं. वाडाच्या निर्णयामुळे या ड्रग्जला प्रतिस्पर्धी निर्माण होण्याची शक्यता आहे.