चर्चेसाठी शरीफ नरमले

By admin | Published: November 29, 2015 03:38 AM2015-11-29T03:38:32+5:302015-11-29T03:38:32+5:30

प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी पाकिस्तान भारताशी बिनशर्त चर्चेस तयार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.

Sharif for discussion | चर्चेसाठी शरीफ नरमले

चर्चेसाठी शरीफ नरमले

Next

वालेटा (माल्टा) : प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी पाकिस्तान भारताशी बिनशर्त चर्चेस तयार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.
पाकचे पंतप्रधान शरीफ राष्ट्रकुल देशांच्या संमेलनासाठी माल्टात आले आहेत. राजधानी वालेटात त्यांनी शुक्रवारी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांची भारत-पाक संबंधांवर चर्चा झाली.
चर्चेदरम्यान शरीफ यांनी भारताशी बिनशर्त चर्चेचा प्रस्ताव ठेवला. शरीफ म्हणाले की, प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत.
शरीफ यांनी पॅरिस हल्ल्याचा यावेळी निषेध केला. ते म्हणाले की, पाकिस्तानी लष्कराची दहशतवाद्यांविरुद्धची जर्ब-ए-अज्ब ही मोहीम आता अंतिम टप्प्यात असून या मोहिमेमुळे देशातील एकूण एक दहशतवाद्यांचा नायनाट होईल. (वृत्तसंस्था)

ब्रिटिश पंतप्रधान कॅमेरून यांनी दहशतवाद आणि कट्टरवादाच्या उच्चाटनासाठी पाकिस्तान करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांची रशियात भेट झाल्यानंतर उभय देशातील चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पाकने फुटीरवाद्याशी चर्चा केल्यामुळे
परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा ऐनवेळी
रद्द झाली. त्यानंतर सीमेवरील तणाव आदी कारणांमुळे उभय देशातील तणाव कायम राहिला.

प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे यासाठी पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाची निर्भत्सना करतो. आम्ही देशातील दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहीम राबवत आहोत.
- नवाज शरीफ

Web Title: Sharif for discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.