शरीफ म्हणाले, पनामा प्रकरणाची चौकशी करू

By admin | Published: April 20, 2016 03:03 AM2016-04-20T03:03:47+5:302016-04-20T03:03:47+5:30

पनामा पेपर प्रकरणात कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आल्यानंतर टीकेला सामोरे जात असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रकरणी चौकशीचा शब्द दिला आहे

Sharif said, "We will investigate the matter of Panama." | शरीफ म्हणाले, पनामा प्रकरणाची चौकशी करू

शरीफ म्हणाले, पनामा प्रकरणाची चौकशी करू

Next

लंडन : पनामा पेपर प्रकरणात कुटुंबातील सदस्यांची नावे समोर आल्यानंतर टीकेला सामोरे जात असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रकरणी चौकशीचा शब्द दिला आहे. मंगळवारी लंडनहून पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट केले की, ते या प्रकरणाच्या चौकशीच्या बाजूने आहेत. त्यासाठी एका न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांची समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पनामा पेपर प्रकरणात शरीफ यांची दोन मुले आणि एक मुलगी यांची नावे समोर आली आहेत. जे पेपर फुटले आहेत त्यानुसार त्यांच्या या तीन मुलांच्या विदेशात कंपन्या आहेत.

Web Title: Sharif said, "We will investigate the matter of Panama."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.