शरीफ यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा

By admin | Published: September 3, 2014 03:15 AM2014-09-03T03:15:38+5:302014-09-03T03:15:38+5:30

पंतप्रधान नवाज शरीफ यांना संसदेच्या तातडीच्या संयुक्त अधिवेशनात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.

Sharif supports political leaders | शरीफ यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा

शरीफ यांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा

Next
इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ यांना संसदेच्या तातडीच्या संयुक्त अधिवेशनात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला.
हिंसाचार व लष्कराकडून हस्तक्षेपाची भीती या पाश्र्वभूमीवर शरीफ यांनी मंगळवारी संसदेत विविध राजकीय नेत्यांचा पाठिंबा मागितला. संसदेचे हे अधिवेशन शरीफ यांना पाठिंबा देण्यासाठी मुद्दाम बोलावण्यात आले होते. यावेळी विद्यमान राजकीय पेचप्रसंगावर चर्चाही झाली. बहुतेक नेत्यांनी शरीफ यांना पाठिंबा व्यक्त केला. 14 ऑगस्टपासून नवाज शरीफ यांच्याविरोधात इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरिक ए इन्साफ व मौलवी ताहिरुल कादरी यांच्या पाकिस्तान अवामी तेहरिकच्या समर्थकांनी निदर्शने सुरू केली आहेत.
अंतर्गत मंत्री चौधरी निसार संसदेत भाषणात म्हणाले की, सध्या जे काही सुरू आहे ती लोकशाही प्रक्रिया असल्याचा भ्रम संसदेने ताबडतोब काढून टाकावा. ती ना निदर्शने आहेत ना निषेध ना राजकीय मेळावा. हे सगळे पाकिस्तानविरुद्धचे बंड आहे.’’ ते निदर्शक सर्वोच्च न्यायालय, संसदेच्या दारांर्पयत पोहोचले. खान व कादरी यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या धरणो आंदोलनाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवरील मंगळवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा गुंता घटनेच्या चौकटीत सोडवावा म्हणून सगळे संसदीय पक्ष व पीएटीला नोटिसा जारी केल्या. (वृत्तसंस्था)
 
4सोमवारी त्यांनी आणखी एका सरकारी इमारतीत घुसून ‘ताहिरूल कादरी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या, असे सांगून निसार म्हणाले,‘‘निदर्शक सशस्त्र होते व त्यांना दहशतवादी संघटनेच्या 15क्क् प्रशिक्षित अतिरेक्यांचा पाठिंबा होता.’’ निसार यांनी कोणत्याही संघटनेचे नाव मात्र घेतलेले नाही. हे निदर्शक घुसखोर होते असे सांगून निसार यांनी त्यांच्या कृत्याला ‘देशाविरुद्ध बंड’ जाहीर करावे, असे आवाहन संसदेला केले. 

 

Web Title: Sharif supports political leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.