शरीफ यांना पुन्हा 24 तासांची मुदत
By admin | Published: August 31, 2014 01:53 AM2014-08-31T01:53:21+5:302014-08-31T01:53:21+5:30
लष्कराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी शनिवारी आणखी एकदा 24 तासांची मुदत दिली.
Next
इस्लामाबाद : लष्कराच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांनंतर विरोधकांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी शनिवारी आणखी एकदा 24 तासांची मुदत दिली.
संघर्षासाठी तयार असलेल्या शरीफ सरकारला पाकिस्तान अवामी तेहरिकचे (पीएटी) प्रमुख मौलवी ताहिरूल कादरी यांनी ही मुदत दिली. शुक्रवारी रात्री उशिरा कादरी यांची इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना तुम्ही पुढील पाऊल सध्याच उचलू नका, असे पटवून दिले. 14 ऑगस्टपासून इम्रान खान व मौलवी कादरी यांनी नवाज शरीफ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केलेली आहे.
गेल्या 15 दिवसांत खान व कादरी यांच्या गटांची ही पहिलीच बैठक होती. कादरी यांनी यापूर्वीही शरीफ यांना अनेक वेळा राजीनाम्यासाठी मुदत दिली होती. कादरी यांनी या बैठकीनंतर पीएटीच्या समर्थकांसमोर भाषण करून खान यांनी केलेली मागणी सांगितली. ही मागणी समर्थकांनी फेटाळून लावली. त्यानंतर कादरी यांनी खान यांच्या मागणीला पाठिंबा देण्याची विनंती त्यांना केली. कादरी म्हणाले, पीएटी आणि पीटीआयचे उद्देश व दृष्टिकोन बरेचसे सारखेच आहेत, दोघांचाही संघर्ष एकाच कारणासाठी आहे त्यामुळे सरकार आपणा दोघांमध्ये फूट पाडू इच्छिते.’’
इम्रान खान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केलेल्या भाषणात त्यांचा पक्ष लाहोर, कराची, फैसलाबाद आणि मुलतानमध्येही धरणो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. खान यांच्या या आंदोलनात सहभागी व्हा, असे कादरी यांनी आपल्या समर्थकांना सांगितले.
पार्लमेंटच्या बाहेर इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांशी बोलताना मी माङो पुढचे पाऊल काय असेल याची घोषणा रविवारी करणार असल्याचे सांगितले. शरीफ सरकारने निवडणूक सुधारणांशी संबंधित सगळ्या मागण्या मान्य केल्या; परंतु नवाज शरीफ यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी फेटाळून लावली आहे. (वृत्तसंस्था)
4सरकार आणि निदर्शकांमध्ये शुक्रवारी झालेली थेट चर्चा अपयशी ठरल्यानंतर या घडामोडी घडल्या. कादरी आणि खान यांनी लष्कर प्रमुखांची गुरुवारी रात्री भेट घेतल्यानंतर पडद्यामागे लष्कर सक्रिय झाले आहे.