पोहायला गेलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; प्रायव्हेट पार्ट केला शरीरापासून वेगळा, दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:57 AM2021-10-16T07:57:13+5:302021-10-16T08:02:45+5:30
समुद्र किनारी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला परत येण्याच्या सूचना दिल्या. परंतु त्याआधीच एका शार्कने त्याच्यावर हल्ला केला
ब्रासीलिया – घरच्यांना विशेषत: आईला न सांगता समुद्रात पोहचण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा युवक पोहचण्यासाठी ज्या समुद्रात गेला होता त्याठिकाणी शार्क मोठ्या प्रमाणात आहेत. लाईफगार्डने सांगूनही युवकाने कुणाचंही न ऐकता अतिधोकादायक क्षेत्रात पोहचण्यासाठी गेला आणि त्याठिकाणी जे काही घडलं ते अत्यंत भयानक होतं. या मुलाच्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
युवक पोहण्यासाठी गेला असता त्याच्यावर शार्कनं (Shark Attack) हल्ला केला त्यात युवकाचा मृत्यू झाला. ज्याठिकाणी शार्क असतात त्या भागात युवक पोहायला गेला. समुद्र किनारी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला परत येण्याच्या सूचना दिल्या. परंतु त्याआधीच एका शार्कने त्याच्यावर हल्ला केला. या शार्कने युवकाच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत तो भाग शरीरापासून वेगळा केला.
भाऊ आणि मित्र होते सोबत
‘द सन’च्या रिपोर्टनुसार, १८ वर्षीय जोस अर्नेस्टर डा सिल्वा घरच्यांना न सांगताच पोहण्यासाठी ब्राझीलच्या उत्तर पूर्व किनारपट्टी पिएडेड बीचवर पोहचला. तो त्याचा भाऊ आणि मित्र यांच्यासोबत पोहण्यासाठी पाण्यात उतरला ज्याठिकाणी शार्कचा धोका अधिक असतो. याठिकाणी असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी या सगळ्यांना बाहेर येण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी सगळे बाहेर आले पण जोस बाहेर येत असतानाच शार्कने त्याच्यावर हल्ला केला.
Lifeguards ने बाहेर काढलं
फायर डिपार्टमेंटच्या Rodrigo Matias यांनी सांगितले की, शार्कने जोसच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करत तो भाग शरीरापासून वेगळा केला. हे पाहून तातडीने लाइफगार्ड पीडित युवकाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरले. अनेक अडचणीनंतर युवकाला खेचत बाहेर आणण्यात आले. परंतु प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. जोसला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आले. परंतु जादा रक्त वाहिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
मृतकाची ४२ वर्षीय आई एलिसेंजेला डॉस अंजोस म्हणाल्या की, जोस घरात काहीही न सांगता बाहेर गेला होता. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा जोसच्या भावाने मला फोन करुन पिएडेड बीचवर बोलावलं. जोसला माहिती होतं जर त्याने माझ्याकडे परवानगी मागितली असती तर मी त्याला नकार दिला असता. कारण ज्याठिकाणी तो गेलाय ती जागा शार्कच्या हल्ल्यासाठी कुप्रसिद्ध आहे. त्यासाठीच त्याने मला काही विचारलं नाही आणि तसाच गेला.