झोप मोडली म्हणून तिने मुलाची बोटे, लिंग छाटले

By admin | Published: October 14, 2015 11:32 PM2015-10-14T23:32:41+5:302015-10-14T23:32:41+5:30

झोप मोडल्याबद्दल शिक्षा म्हणून महिलेने सहा वर्षांच्या मुलाची चाकूने बोटे व लिंग छाटले. शाओडोंग प्रांतात हा भयानक प्रकार घडला, असे सरकारी वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ने बुधवारी वृत्त दिले.

As she fell asleep, she spotted her boy's fingers and penis | झोप मोडली म्हणून तिने मुलाची बोटे, लिंग छाटले

झोप मोडली म्हणून तिने मुलाची बोटे, लिंग छाटले

Next

बीजिंग : झोप मोडल्याबद्दल शिक्षा म्हणून महिलेने सहा वर्षांच्या मुलाची चाकूने बोटे व लिंग छाटले. शाओडोंग प्रांतात हा भयानक प्रकार घडला, असे सरकारी वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ने बुधवारी वृत्त दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेचे नाव लिवू असून ती मनोरुग्ण आहे. लिवू तिच्या चुलत भावाच्या घरात झोपली होती. तेव्हा शेजारचा मुलगा शिओमिंग तिच्या खोलीत खेळायला आला. त्याच्या आवाजामुळे झोप मोडलेल्या लिवूने त्याला बाहेर काढून दार लावून घेतले; परंतु थोड्याच वेळात शिवोमिंग पुन्हा खोलीत येऊन खेळू लागला. त्यावर संतापलेल्या लिवूने स्वयंपाकघरातील चाकू व कात्रीने शिवोमिंगची बोटे, डोके, चेहरा, शरीराचा अन्य भाग व लिंगावर वार केले व ती तेथून पळून गेली. (वृत्तसंस्था)

Web Title: As she fell asleep, she spotted her boy's fingers and penis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.