ती प्राणांची भीक मागत राहिली, पण हमासच्या दहशतवाद्यांचे हृदय नाही पाघळले, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 07:34 PM2023-10-08T19:34:42+5:302023-10-08T19:39:05+5:30
Israel-Hamas war: इस्राइलच्या दक्षिण भागातून हमासचे दहशतवादी इस्राइलमध्ये घुसले. त्यांनी इस्राइली आणि परदेशी नागरिकांना धाक दाखवून त्यांच्यापैकी अनेकांचे अपहरण केले. आता या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं क्रौर्य दिसत आहे.
पॅलेस्टाइनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलमध्ये तुफानी हल्ला करतानाचा मोठ्या प्रमाणावर दहशत माजवली आहे. शनिवारी इस्राइलच्या दक्षिण भागातून हमासचे दहशतवादी इस्राइलमध्ये घुसले. त्यांनी इस्राइली आणि परदेशी नागरिकांना धाक दाखवून त्यांच्यापैकी अनेकांचे अपहरण केले. आता या घटनांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांचं क्रौर्य दिसत आहे.
अनेक व्हिडीओंमध्ये हमासचे दहशतवादी लोकांना बंधक बनवताना दिसत आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार एका महिलेचं हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलं. तसेच तिला दुचाकीवरून गाझामध्ये घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Noa was partying in the south of Israel in a peace music festival when Hams terrorists kidnapped her and dragged her from Israel into Gaza.
— Hen Mazzig (@HenMazzig) October 7, 2023
Noa is held hostage by Hamas.
She could be your daughter, sister, friend.#BringBackOurFamilypic.twitter.com/gi2AStVdTQ
या व्हिडीओमध्ये एका तरुणीला हमासचे दहशतवादी एका दुचाकीवरून जबरदस्तीने घेऊन गेले. या दरम्यान, ही तरुणी दहशतवाद्यांकडे प्राणांची भीक मागत होती. या तरुणीचं नाव नोआ असल्याचं समोर आलं आहे. नोआ ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत एका पार्टीमध्ये गेली होती. तिथे हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. या व्हिडीओमध्ये नोआ तिचा जीव वाचवण्यासाठी गयावया करताना दिसत आहे.
दरम्यान, नोआचा बॉयफ्रेंड नाथन याचा भाऊ मोशे ओर्सने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आपातकालीन पथकांना नाथन आणि त्याची प्रेयसी नोआ यांच्या अपहरणाच्या व्हिडीओबाबत सूचित करण्यात आले आहे.