तिला वाटले जुळी मुले, पण..
By admin | Published: June 7, 2017 12:28 AM2017-06-07T00:28:23+5:302017-06-07T00:28:23+5:30
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, तिच्या पोटात एक मोठा गोळा (गाठ) वाढत आहे
Next
न्यूयॉर्क : ही घटना आहे अमेरिकेतील. सिल्विया नावाच्या या महिलेच्या पोटाचा आकार दिवसेंदिवस वाढत होता. तिला वाटले की, तिच्या पोटात जुळ्यांची वाढ होत आहे. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा वस्तुस्थिती जाणून तिला धक्काच बसला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, तिच्या पोटात एक मोठा गोळा (गाठ) वाढत आहे. आपल्या पोटात जुळ्यांची वाढ होत आहे असे तिला वाटत होते; पण प्रत्यक्षात एका आजाराने तिला घेरले होते. डॉक्टरांनी तिच्या पोटातून १२ किलोचा गोळा काढला.