अखेर तिला फाशी देण्यात आली..!
By Admin | Published: October 26, 2014 02:06 AM2014-10-26T02:06:41+5:302014-10-26T02:06:41+5:30
अब्रू वाचविण्यासाठी नराधमाची हत्या करणा:या रेहाना जब्बारी या महिलेस ठोठाविण्यात आलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात यावी,
तेहरान : अब्रू वाचविण्यासाठी नराधमाची हत्या करणा:या रेहाना जब्बारी या महिलेस ठोठाविण्यात आलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात यावी, या आवाहनाची दखल न घेता अखेर तिला शनिवारी सकाळी तेहरान येथील तुरुंगात फाशी देण्यात आली.
गुप्तचर मंत्रलायातील माजी कर्मचारी मुतरुझा अब्दोलाली याची हत्या केल्याच्या आरोपावरून 2क्क्7 मध्ये रेहाना जब्बारी या 26 वर्षीय महिलेस अटक करण्यात आली होती.
तिला ठोठाविण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून फेसबुक आणि टि¦टरवरून सातत्याने आवाहन केले जात होते. रेहानाच्या कुटुंबियांना यासाठी मुतरुझाच्या कुटुंबियांची सहमती मिळविण्यास अपयश आल्याने शनिवारी सकाळी तिला तेहरानमधील तुरुंगात फाशी देण्यात आली, असे तन्सीम या इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले. आत्मसंरक्षणासाठी हत्या झाल्याचा तर्क न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही, असेही या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. मानवी हक्कासाठी लढणा:या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने इराण सरकारचा हा निर्णय अत्यंत निराशादायी असल्याचे म्हटले. (वृत्तसंस्था)
रेहानाच्या आईने बीबीसीला दिलेल्या मुलाखातीत रेहानाला फाशी देण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. अटकेनंतर रेहानाला एकांतवासात ठेवण्यात आले होते. वकील किंवा तिच्या कुटुंबियांनाही तिला भेटू दिले जात नव्हते. 2क्क्9 मध्ये तेहरान येथील कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती.