शेर बहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान
By admin | Published: June 6, 2017 08:58 PM2017-06-06T20:58:46+5:302017-06-06T20:58:46+5:30
नेपाळमधील ज्येष्ठ नेते आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 6 - नेपाळमधील ज्येष्ठ नेते आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. आज नेपाळच्या संसदेत झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत देऊबा यांना 388 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ170 मतांवर समाधान मानावे लागले.
गेल्या महिन्यात माओवादी नेते पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नेपाळचे पंतप्रधानपद रिक्त झाले होते. तसेच देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर आज देऊबा यांची पंतप्रधान पदावर निवड झाल्याने ही अस्थिरता संपुष्टात आली आहे. नेपाळचे पंतप्रधानपद भूषणवण्याची देऊबा यांची ही चौथी वेळ आहे. याआधी 1995 ते 97. 2001 ते 02 आणि 2004 ते 05 या काळात त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते.