Nepal PM: शेर बहादूर देउबा नेपाळचे नवे पंतप्रधान; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बहुमत सिद्ध केले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 10:17 PM2021-07-18T22:17:32+5:302021-07-18T22:18:04+5:30
Sher Bahadur Deuba won: देऊबा यांनी 275 सदस्यांच्या संसदेत 163 मते मिळविली आहेत. तत्पूर्वी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने देऊबांना 28 तासांत पंतप्रधान पदी निवडण्याचे आदेश दिले होते.
नेपाळमधील राजकीय संकट अखेर शमले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba) यांनी नेपाळच्या संसदेत मताधिक्य मिळविले आहे. यामुळे संसद बरखास्त करणाऱ्या के.पी. ओली यांना मोठा धक्का बसला आहे. देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान (Prime Minister of Nepal) बनले आहेत. (Nepal PM Sher Bahadur Deuba wins vote of confidence with 163 votes in the 275-member House of Representatives)
देऊबा यांनी 275 सदस्यांच्या संसदेत 163 मते मिळविली आहेत. तत्पूर्वी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने देऊबांना 28 तासांत पंतप्रधान पदी निवडण्याचे आदेश दिले होते. के.पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील 5 महिन्यांत दुसऱ्यांदा बहुमत चाचणी गमावली होती. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यांच्या पीठाने हे आदेश दिले होते.
Nepal PM Sher Bahadur Deuba wins vote of confidence with 163 votes in the 275-member House of Representatives pic.twitter.com/rJiwlVnM8D
— ANI (@ANI) July 18, 2021
नेपाळचे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी मे मध्ये नेपाळची 275 सदस्यांची संसद भंग केली होती. यानंतर नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा केली होती. राष्ट्रपतींच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्य न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर विरोधकांनी न्यायालयात 30 हून अधिक याचिका दाखल केल्या होत्या. यामध्ये राष्ट्रपतींचा आदेश चुकीचा असल्याचे म्हटले होते. यामुळे नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबायांना पंतप्रधान केले जावे, अशी मागणी त्यांनी या याचिकांद्वारे केली होती. यावर जवळपास 150 खासदारांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.