लिबियामध्ये भरसमुद्रात बुडाले जहाज, आठ प्रवाशांना जलसमाधी तर 85 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:46 PM2017-09-22T23:46:14+5:302017-09-22T23:46:45+5:30

या जहाजवरून सुमारे 100 लोक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक जहाज तुटले. या दुर्घटनेत सात लोकांना वाचवण्यात बचाव दलाला यश आले आहे, बाकी लोक बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य चालू आहे.

Shipwrecked in Libya, eight passengers, waterlogged and 85 missing | लिबियामध्ये भरसमुद्रात बुडाले जहाज, आठ प्रवाशांना जलसमाधी तर 85 जण बेपत्ता

लिबियामध्ये भरसमुद्रात बुडाले जहाज, आठ प्रवाशांना जलसमाधी तर 85 जण बेपत्ता

Next

त्रिपोली, दि. 22 : लिबियामध्ये एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत 8 प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे तर साधारणपणे 90 जण बेपत्ता असल्याचे वृत्ता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. लिबिया नौसेनेने दिलेल्या माहितीनुसार त्रिपोलीच्या पश्चिम शहरात साब्राथा तटजवळ ही दुर्घटना घडली आहे. युरोपला जाण्यासाठी असणाऱ्या मार्गवर अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

या जहाजवरून सुमारे 100 लोक प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक जहाज तुटले. या दुर्घटनेत सात लोकांना वाचवण्यात बचाव दलाला यश आले आहे, बाकी लोक बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य चालू आहे. यापूर्वी झालेल्या दुर्घटनेत लीबिया कोस्टगार्डने युरोपकडे जाणाऱ्या 3 हजार प्रवाशांना वाचवले होते. तर 2 हजार लोकांना वाचवण्यात इटलीला यश आले होते. 

मे मध्ये भूमध्य समुद्रात 500 प्रवासी असलेले एक जहाज उलटले. या दुर्घटनेत 200 लोक बुडाले तर सुमारे 34 लोकांचा मृत्यू झाला. आफ्रिकन देशातून भूमध्य समुद्र ओलांडून युरोपला जाणाऱ्या जलवाहतुकीसाठी लीबिया हे केंद्र आहे. युरोपीय संघ आणि तुर्की यांच्यात झालेल्या करारानंतर ग्रीसच्या मार्गाने होणारी वाहतूक बंद केली. त्यामुळे अधिकतर वाहतूक भूमध्य समुद्रातूनच होते. आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार या वर्षी भूमध्य समुद्रातून होणाऱ्या वाहतुकीत 559 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी ही संख्या 5000 इतकी होती. 
 

Web Title: Shipwrecked in Libya, eight passengers, waterlogged and 85 missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.