दानपेटीमध्ये सापडली अशी भयानक वस्तू पाहताच बसला धक्का, बोलवावे लागले पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:18 AM2023-09-08T10:18:36+5:302023-09-08T10:19:10+5:30
International News: जगभरात अनेक ठिकाणी गुडविल स्टोअर्स असतात. येथे गरिबांसाठी काही दान करता येतं. येथील दानपेट्यांमध्ये गरजेच्या वस्तू, पैसे ठेवले जातात. नंतर हे सामान गरजवंतांना स्वस्त किंवा मोफत दिलं जातं. हल्लीच अमेरिकेमध्ये एका गुडविल स्टोअरमध्ये जे काही झालं ते भायावह होतं.
जगभरात अनेक ठिकाणी गुडविल स्टोअर्स असतात. येथे गरिबांसाठी काही दान करता येतं. येथील दानपेट्यांमध्ये गरजेच्या वस्तू, पैसे ठेवले जातात. नंतर हे सामान गरजवंतांना स्वस्त किंवा मोफत दिलं जातं. हल्लीच अमेरिकेमध्ये एका गुडविल स्टोअरमध्ये जे काही झालं ते भायावह होतं.
सर्वसाधारणपणे दानपेट्या उघडून त्यामध्ये ठेवलेल्या वस्तूंना चांगल्या कामासाठी वापरले जाते. मात्र या गुडविल स्टोअरमध्ये एकेदिवशी जेव्हा दानपेटी उघडली गेली, तेव्हा स्टोअरच्या संचालकांना धक्काच बसला. दानपेटीत जे दिसलं ते पाहून त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. ही कुठली रोजच्य वापरातील वस्तू नव्हती. ना खाण्यापिण्याची वस्तू होती, ना पैसे होते. ही होती एक मानवी कवटी.
ही कवटी ५ सप्टेंबर रोजी स्टोअरमध्ये सापडली. स्थानिक अधिकारी ती घेऊन गेले. कुठल्या गंभीर गुन्ह्यामुळे तर ही कवटी इथे आली नाही ना, याची तपासणी केली गेली. ही कवटी टॅक्सीडर्मिड वस्तूंच्या एका कंटेनरमध्ये सापडली होती. दरम्यान, ही कवटी कुणाची होती, हे ओळखणं कठीण होतं.
गुडइयर पोलीस विभागाने याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक कवटी दिसत आहे. तिच्यावरचे काही दात अजूनही टिकून आहेत. तसेच डावीकडे एक बनावट डोळा दिसत आहे. एकंदरीत ही भयावह वस्तू होती. दोन नियमित खरेदीदारांनी स्थानिक फॉक्स सहकारी केएसएझेड टीव्हीला सांगितले की, हे खूपच भयावह होते.
गुडइयर पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणी कार्यालयाशी बोलल्यानंतर ही मानवी कवटी ही ऐतिहासिक म्हणजेच खूप जुनी आहे. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी यामध्ये काहीही वाचलेलं नाही.