धक्कादायक! मुलीसोबत सेक्स केल्यानं पित्यानं 15 वर्षीय मुलाचं छाटलं लिंग
By Admin | Published: April 16, 2017 04:21 PM2017-04-16T16:21:03+5:302017-04-16T16:44:39+5:30
पाकिस्तानात एका व्यक्तीनं चार साथीदारांच्या मदतीनं एका मुलाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 16 - पाकिस्तानात एका व्यक्तीनं चार साथीदारांच्या मदतीनं एका मुलाचं लिंग कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीसोबत सेक्स करत असल्याचा संशय असल्यानं मुलीच्या वडिलांनी 15 वर्षांच्या मुलाचं लिंग कापून शरीरापासून डोळाही वेगळा केला आहे. आरोपी आणि त्याच्या चार साथीदारांनी लाहोरहून मुलाचं अपहरण केल्याची बाब पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी सांगितली आहे. त्यानंतर मुलाला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे.
मुलीचे वडील आणि त्याच्या चार साथीदारांनी मुलाचं शाळेतून अपहरण केलं आणि त्याला नदीकिनारी एका निर्जनस्थळी नेण्यात आलं आणि तिकडेच त्याचं अमानुषपणे गुप्तांग कापण्यात आलं असून, त्याचा डोळाही काढण्यात आला, त्यानंतर तिथून जात असलेल्या एका व्यक्तीनं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मुलाला पाहिलं आणि रुग्णालयात दाखल केलं. लाहोर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे, असं वृत्त पाकिस्तानी वर्तमानपत्र द नेशननं दिलं आहे.
मात्र जर त्या मुलाचा मृत्यू झाला असता तर मुलीच्या वडिलासह चार आरोपींवर ऑनर किलिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानात 2015मध्ये कुटुंबीयांचा अपमान केल्याप्रकरणी जवळपास 1100 मुली आणि महिलांची हत्या करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानातील स्वतंत्र मानवी हक्क आयोगाने दिली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या हत्या करणा-यांसाठी कायद्यात कडक तरतूदही करण्यात आली आहे.