तुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 02:01 PM2018-10-04T14:01:51+5:302018-10-04T14:52:11+5:30
इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे.
इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे. तर 71 हजार रुपयांत त्या व्यक्तीची सर्व ऑनलाईन माहिती मिळत असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. केवळ फेसबुकच नाही तर जीमेल आयडीचा पायवर्डही केवळ 200 रुपयांत दिला जात असल्याचे या कंपनीने सांगितल्याने जगभरातील युजर्समध्ये मोठी खळबळ माजली आहे.
डार्क वेबवर एखाद्या व्यक्तीच्या केवळ फेसबुक किंवा जीमेलच नाही तर त्याच्या सर्व ऑनलाईन सोशल मिडियावरील माहितीशिवाय ऑनलाईन शॉपिंग आणि बँकेची माहितीही पिनकोडसह मिळत आहे. यासाठी काही प्रमाणात पैसेही मोजावे लागतात, असा खळबळजनक दावा या मनी गुरुने केला आहे.
या अहवालानुसार कोणत्याही व्यक्तीची सर्व माहिती केवळ 970 डॉलर म्हणजेच 71 हजार रुपयांत विकली जाते. यामध्ये सर्व सोशल मिडीयावरील युजरनेम, पासवर्ड, इमेल आयडी यासह त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, फोन नंबर सह बँकेची क्रेडीट-डेबिट कार्डची माहीतीही विकली जाते.
या विक्रीमध्ये इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या वेबसाईटचाही डेटा विकला जातो. ट्विटरवर 3.26 डॉलर म्हणजेच 240 रुपये आणि 6.30 डॉलर म्हणजेच 460 रुपयांना विकली जाते.
डार्क वेब म्हणजे काय?
इंटरनेटच्या मागे जी माहिती साठविली जाते किंवा जी प्रक्रिया चालते ती आपण पाहू शकत नाही. याला डार्क वेब म्हणतात. आपण जे इंटरनेटवर पाहतो ते केवळ 4 टक्के आहे. उर्वरित 96 टक्के इंटरनेट हे डार्क वेबमध्ये येते. यावर जगभरातील हॅकर्सचा डोळा असतो. ही माहीत चोरल्यानंतर ती विकली जाते. डार्क वेब हे साध्या ब्राऊजरवर दिसत नाही. त्यासाठी टॉर ब्राऊजर लागतो. त्यांना ट्रॅक करणे जिकीरीचे आहे. यामध्ये हॅकिंग केले जाते. पैसे दिल्यावर सर्व माहिती मिळते.