Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:58 PM2024-11-12T18:58:09+5:302024-11-12T18:58:44+5:30
दक्षिण चीनच्या झुहाई शहरात ही घटना घडली आहे. छोट्या एसयुव्हीने एवढ्या जणांचा जीव घेतल्याच्या वृत्तावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाहीय.
चीनमध्ये एक आश्चर्यकारक आणि तितकीच खळबळजनक घटना घडली आहे. एका हायप्रोफाईल कार्यक्रमावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या गर्दीमध्ये एका कार घुसली आणि या अपघातात तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची दखल चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली आहे.
दक्षिण चीनच्या झुहाई शहरात ही घटना घडली आहे. छोट्या एसयुव्हीने एवढ्या जणांचा जीव घेतल्याच्या वृत्तावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाहीय. परंतू, चीन प्रशासनाने याची पुष्टी केली आहे. सोमवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.
एका स्पोर्ट सेंटरच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर लोक जमले होते. हे लोक काही व्यायाम करत होते. यावेळी अचानक छोटी ऑफ रोड एसयुव्ही भरधाव वेगात या लोकांच्या गर्दीत घुसली आणि एकमागोमाग एक अनेक लोकांना उडवत पुढे गेली. फॅन या आडनावाचा ६२ वर्षीय व्यक्ती ही कार चालवत होता. मृत्यूंची संख्या पाहता हा हल्ला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एक छोटी एसयुव्ही स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या आतील रस्त्यावर आली आणि जोरात सर्वांना उडवत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. फॅन हा कारमध्ये चाकूने स्वत:वर वार करत होता, त्याला तातडीने थांबविण्यात आले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर त्याने मानेवर वार करून घेतल्याने तो कोमामध्ये गेला आहे. यामुळे तो शुद्धीत आल्यावरच हा हल्ला होता की अपघात हे समजू शकणार आहे.