धक्कादायक, सलून वर्करमुळे 91 लोकांना झाला संसर्ग, लॉकडाऊन हटवणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 16:27 IST2020-05-25T16:26:55+5:302020-05-25T16:27:20+5:30
येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. अमेरिकेने मार्चपासून लाॅकडाऊनचे कडक पालन करण्यास सुरुवात केली हाेती.

धक्कादायक, सलून वर्करमुळे 91 लोकांना झाला संसर्ग, लॉकडाऊन हटवणे पडले महागात
अमेरिकेत ३० राज्यांत लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ११ राज्यांच्या काही भागांत लाॅकडाऊनमध्ये सवलत दिली. ४ राज्ये पुढील आठवड्यात लाॅकडाऊनमध्ये सवलत देतील. पाच राज्यांत मात्र अजूनही कडक लाॅकडाऊन लागू राहणार आहे. अमेरिकेत लाॅकडाऊनमधील सवलती अंतर्गत किनारपट्या, जिम, रिटेल दुकाने, रेस्तराँ, बार, सलून, थिएटर, उद्याेग, कार्यालये, धार्मिक स्थळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य आहे. अमेरिकेने मार्चपासून लाॅकडाऊनचे कडक पालन करण्यास सुरुवात केली हाेती.
अमेरिकेत लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची जोखीम वाढली आहे. मिसोरीमध्ये बाधित सलून वर्करमुळे ९१ जणांना बाधा झाली. त्यात ८४ ग्राहक, ७ सहकाऱ्यांचा समावेश आहे. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतर प्रादुर्भाव झालेला कामगार आठ दिवस कामावर आला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.मिसोरीमध्ये ४ मेपासून सलून सुरू झाले होते. कोराेना संसर्गाचे येथे ११ हजार ७५२ रुग्ण असून ६७६ जणांचा त्यात मृत्यू झाला.
अमेरिकेत दोन आठवडे आधी लॉकडाऊन लागू केला असता तर कोरोना विषाणू संसर्गामुळे ८३ टक्के प्राण वाचवता येऊ शकले असते. कोलंबिया विद्यापीठातील एका अभ्यासाद्वारे हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांनी ३ मेपर्यंत आकड्यांचा अभ्यास केला. त्यानुसार सरकारने १ मार्चपूर्वी लॉकडाऊन लागू केला असता तर ११ हजार २५३ जणांचा मृत्यू झाला असता असे सर्व्हेक्षणारून सांगितले जात आहे.