'त्यानं' आधीच दिला होता प्रलयाचा 'अल्टीमेटम'? आता जगानं बघितला म्यानमार अन् थायलंडमध्ये निसर्गाचा 'कहर'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 17:43 IST2025-03-30T17:42:10+5:302025-03-30T17:43:38+5:30
Myanmar Thailand Earthquake : महत्वाचे म्हणजे, शास्त्रज्ञ मंडळी ही मान्यता नाकारत आहेत...

'त्यानं' आधीच दिला होता प्रलयाचा 'अल्टीमेटम'? आता जगानं बघितला म्यानमार अन् थायलंडमध्ये निसर्गाचा 'कहर'!
म्यानमार आणि थायलंडमध्ये नुकताच मोठा भूकंप झाला. या भूकंपात शेकडो लोक मारले गेले असून अनेक बेपत्ता आहेत. आता या भूकंपासंदर्भात काही दावेही केले जात आहेत. खरे तर, येथील अटलांटिक महासागरातील कॅनरी बेटावर एक दुर्मिळ ओरफिश डूम्सडे फिश दिसून आला होता. या माशाला 'प्रलयाचा मासा' असे म्हटले जाते. कारण, तो दिसल्यानंतर, नैसर्गिक आपत्ती येते, असे मानले जाते. या माशाचे शरीर लांब, रिबनसारखे चमकदार असते. तसेच, या माशाला खोल समुद्रात राहायला आवडते. यामुळे, हा मासा जेव्हा वर अथवा पृष्ठभागावर दिसतो तेव्हा लोक, याला एखाद्या दुर्घटनेचा संकेत मानतात. यामुळे, या भूकंपाचा संबंधही या माशासोबत जोडला जात आहे.
जपानमध्ये सर्वाधिक मान्यता -
काही माध्यमांतील वृत्तानुसार, या रहस्यमय माशासंदर्भात जपानमध्ये सर्वाधिक मान्यता आहे. या माशाला जपानमध्ये 'रयुगु नो त्सुकाई' अर्थात 'समुद्रातील देवतांच्या महालातील दूत'असे म्हटले जाते. २०११ साली जपानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाच्या आणि त्सुनामीच्या काही महिने आधी समुद्रकिनाऱ्यांवर अनेक ऑरफिश दिसले होते. याशिवाय, २०१७ मध्ये, ऑरफिश दिसल्यानंतर लगेचच फिलीपिन्समध्ये भूकंप आला होता. या उलट, अनेक वेळा, हा मासा दिसला, पण कसल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली नव्हती, असेही घडले आहे. यामुळे, या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
आता ओरफिश दिसल्यानंतर, काही दिवसांतच म्यानमार आणि थायलंडमध्ये जबरदस्त भूकंप आला आहे. शुक्रवारी आलेल्या या भीकंपाची तीव्रता 7.6 रिश्टर स्केल एवढी होती. या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर लोक या घटनेकडे ओरफिशला जोडून बघत आहेत. यामुळे हा ओरफीश मासा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
मासा ठरलाय वादाचा विषय -
महत्वाचे म्हणजे, शास्त्रज्ञ मंडळी ही मान्यता नाकारत आहेत. त्यांच्या मते, ओअरफिश खोल समुद्रात राहतो. त्याला पाण्यातील हालचाली जाणू शकतात. यामुळे ते कधीकधी पृष्ठभागावर येतात. मात्र, याचा भूकंप अथवा आपत्तीशी थेट संबंध नाही. जपानमध्ये केलेल्या अभ्यासातही ऑरफिश आणि भूकंप याचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झालेले नाही. मात्र, असे असले तरी, वारंवार होणाऱ्या घटनांमुळे, हा मासा चर्चेचा विषय बनला आहे.