धक्कादायक...! पाकव्याप्त काश्मिरात बंकरांमध्ये होतेय काश्मिरी तरुणींचे शोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:39 PM2019-03-27T17:39:29+5:302019-03-27T17:56:34+5:30

2005 मधील भुकंपानंतर हे अत्याचार सुरुच आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य स्थितीवेळी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बंकर उभारण्यात आले आहेत.

Shocking ...! Exploit of Kashmiri women in Pakistan-occupied Kashmir bunkers | धक्कादायक...! पाकव्याप्त काश्मिरात बंकरांमध्ये होतेय काश्मिरी तरुणींचे शोषण

धक्कादायक...! पाकव्याप्त काश्मिरात बंकरांमध्ये होतेय काश्मिरी तरुणींचे शोषण

इस्लामाबाद : हिंदू मुलींना पळवून त्याना जबरदस्ती धर्मांतर करण्याच्या घटनेनंतर पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बचावासाठी बनविलेल्या बंकरांमध्ये काश्मीरी महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा गौप्यस्फोट एका पिडीत महिलेने केला आहे. धक्कादायक म्हणजे 2005 मधील भुकंपानंतर हे अत्याचार सुरुच आहेत.

 
पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य स्थितीवेळी नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बंकर उभारण्यात आले आहेत. या बंकरांमध्ये 2005 मध्ये भूकंप झाल्यावर लोकांना निवारा देण्यात आला होता. या काळापासून महिलांचे अपहरण करण्यात येत असून या बंकरांमध्ये त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत आहेत. महिला आता या बंकरांमध्ये जाण्यास इच्छुक नाहीत. 


पाकिस्तानी मिडीयानुसार या शिबिरांमध्ये आणि बंकरांमध्ये महिलांसोबत जे झाले त्याची चर्चा पूर्ण काश्मीरमध्ये ऐकायला मिळते. यामुळे या भागातील महिला सरकारच्या तात्पुरत्या निवाऱ्यापेक्षा इस्लामाबादला जाण्यास इच्छुक असतात. मात्र, काहीच कुटुंबे तिकडे जाऊ शकली आहेत. 


पाकिस्तानने 1990 मध्ये या भागात निवाऱ्यासाठी बंकर बनविले आहेत. 13 बाय 7 फूट असे या बंकरांचा आकार आहे. सीमेवर गोळीबार सुरु झाल्यास या ठिकाणी 20 ते 30 लोकांना ठेवण्यात येते. मात्र, इतर काळात हे बंकर महिलांच्या लैंगिक शोषणाचे अड्डे बनले आहेत. सीमेजवळ राहणाऱ्या महिलांना गोळीबारापासून वाचण्यासाठी या बंकरांचा आधार घ्यावा लागतो. 


या अत्याचाराबाबत कोणीही अद्याप तक्रार केलेली नसून पीओकेच्या नीलम घाटीतील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर हा धक्कादायक खुलासा केला आहे. 1990 मध्ये बऱ्याचदा महिलांवर अभद्र टीप्पणी केली जायची. मात्र, याकडे महिला दुर्लक्ष करायच्या. नंतर स्थानिक लोक आणि सैनिकांकडून या महिलांना, तरुणींना पळवून नेले जायचे आणि त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. मात्र, याबाबत जर बोलले गेले तर या मुलींशी लग्न कोण करणार या भीतीने याकडे कोणी लक्ष देत नव्हते. या पिडीत महिला आयुष्य तणाव, संकटात घालवत आहेत. 

Web Title: Shocking ...! Exploit of Kashmiri women in Pakistan-occupied Kashmir bunkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.