CoronaVirus धक्कादायक! कोरोनाच्या आडून पाकिस्तानने हाफिज सईदला तुरुंगातून सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:07 PM2020-05-02T23:07:37+5:302020-05-02T23:07:37+5:30
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात ट्विट केले होते की, लाहोर तुरूंगात सुमारे 50 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
इस्लामाबाद : कोरोना व्हायरसचे कारण देत पाकिस्तानने जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्यास सुरुवात केली आहे. पाकने दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदसह अन्य दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडून दिले आहे. याच दहशतवाद्यांवर कारवाई केल्याचे दाखवत पाकिस्तान एफएटीएफच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचला होता. आता हे दहशतवादी भारताविरोधात कारवाया करण्यात गुंतले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात ट्विट केले होते की, लाहोर तुरूंगात सुमारे 50 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या संधीचा फायदा घेत पाकिस्तानने तातडीने दहशतवाद्यांना मुक्त केले. सध्या जगाचे लक्ष कोरोनाशी लढण्यावर आहे. याचाच फायदा पाकिस्तानने उचलला आहे.
या वर्षाच्या सुरूवातीला एफएटीएफची बैठक पाकिस्तानच्या विषय़ावर होणार होती. कोरोनाव्हायरसमुळे ही बैठक दोनदा तहकूब करण्यात आली आहे. जूनमध्ये होणारी ही बैठक आता ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. पाकिस्तानला जूनपर्यंत दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मुदत देण्यात आली आहे. या संस्थेने पाकिस्तानला ग्रे यादीमध्ये ठेवले आहे. या बैठकीमध्ये पाकिस्तानने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे. सकारात्मक आढळल्यास काळ्या यादीत न टाकण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात पाकिस्तानने 7600 दहशतवाद्यांपैकी ४००० दहशतवाद्यांची नावे कारवाईच्या यादीतून काढून टाकल्याचे समोर आले होते. मार्चच्या सुरूवातीस सुमारे 1800 नावे काढली गेली आहेत. ही नावे हटविण्याचे कारणही दिले गेले नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! महाराष्ट्रातून बसद्वारे मजुरांना नेले; युपीमध्ये 7 जण कोरोनाग्रस्त निघाले
मुंबई, पुणेकरांना परवानगी नाहीच! जिल्हांतर्गत प्रवासाला पोलिसांकडून नकार
CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू
CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण...
जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम