China Nuclear Test: धक्कादायक! चीनच्या न्यूक्लियर टेस्टिंगमधून निघालेल्या रेडिएशनमुळे १.९४ लाख लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:40 AM2021-08-23T10:40:40+5:302021-08-23T10:42:02+5:30

China Nuclear Test News: गेल्या काही काळात कोरोनासह इतर काही घटनांमुळे चीन हा जगातील अनेक देशांच्या रडारवर आला आहे. दरम्यान, चीनचा अजून एक महाभयानक चेहरा जगासमोर आला आहे.

Shocking! Radiation from China's nuclear testing kills 1.94 Lacks people | China Nuclear Test: धक्कादायक! चीनच्या न्यूक्लियर टेस्टिंगमधून निघालेल्या रेडिएशनमुळे १.९४ लाख लोकांचा मृत्यू

China Nuclear Test: धक्कादायक! चीनच्या न्यूक्लियर टेस्टिंगमधून निघालेल्या रेडिएशनमुळे १.९४ लाख लोकांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही काळात कोरोनासह इतर काही घटनांमुळे चीन हा जगातील अनेक देशांच्या रडारवर आला आहे. दरम्यान, चीनचा अजून एक महाभयानक चेहरा जगासमोर आला आहे.  (China Nuclear Test) एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार चीनने १९६४ ते १९९६ दरम्यान सुमारे ४५ अणुचाचण्या घेतल्या होत्या. दरम्यान, या अणुचाचण्यांमुळे निर्माण झालेल्या तीव्र किरणोत्सारामुळे तब्बल १ लाख ९४ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. द नँशनल इंटरेस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून हा दावा करण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, सुमारे १२ लाख लोकांना या रेडिएशनमुळे ल्युकेमिया आणि कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका असल्याचाही अंदाज आहे. (Radiation from China's nuclear testing kills 1.94 Lacks people)

पीटर सुसिऊ यांनी त्यांच्या लेखात लिहिले आहे की, चीनने जगातील पाचवी अणुशक्ती बनल्यानंतर जून १९६७ मध्ये पहिली अणुचाचणी घेतल्यानंतर केवळ ३२ महिन्यांनंतर पहिले थर्मोन्युक्लिअर परीक्षण केले. या चाचणीमधून ३.३ मेगाटन एवढी ऊर्जा निर्माण झाली. ही ऊर्जा हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा २०० पट अधिक होती. मात्र परमाणू परीक्षणाचे आकडे खूप कमी आहे. त्यामुळे याच्या प्रभावाबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात आलेले नाही. झिंजियांग प्रांतामध्ये दोन कोटी लोकांची वस्ती आहे. तिथे किरणोत्सारामुळे लोक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.

द नँशनल इंटरेस्ट च्या रिपोर्टनुसार  किरणोत्सर्गाच्या स्तराचा अभ्यास करणारे एक जपानी संशोधकांनी सांगितले की, शिनजियांगमधील किरणोत्सर्गाचे प्रमाण हे १९८६ मधील चेर्नोबिलमधील अणुभट्टीच्या छतावर मोजण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा अधिक आहे. रेडिओ अँक्टिव्ह धूळ सगळीकडे पसरली आहे. त्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.  चीनने १९६४ मध्ये लोप-नूर प्रोजेक्ट मध्ये आपली पहिली अणुचाचणी घेतली होती. अमेरिकेने या अणुचाचणीला चिक-१ असे नाव दिले होते.

Web Title: Shocking! Radiation from China's nuclear testing kills 1.94 Lacks people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.