धक्कादायक! ‘त्या’ फंडमध्ये सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच भागीदार; हिंडेनबर्गचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 05:43 AM2024-08-11T05:43:43+5:302024-08-11T05:44:06+5:30

सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरित केल्याचा आरोप

Shocking Sebi Chairman Madhavi Puri Buch Partners in 'That' Fund Hindenburg claim | धक्कादायक! ‘त्या’ फंडमध्ये सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच भागीदार; हिंडेनबर्गचा दावा

धक्कादायक! ‘त्या’ फंडमध्ये सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुच भागीदार; हिंडेनबर्गचा दावा

वाॅशिंग्टन: ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर आराेप केले आहेत. अदानी प्रकरणात वापरण्यात आलेल्या ऑफशाेअर फंडमध्ये पुरी बुच व त्यांचे पती धवल यांची हिस्सेदारी हाेती, असा दावा ‘हिंडेनबर्ग’ने केला आहे. 

‘हिंडेनबर्ग’ने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, बुच दाम्पत्याकडे अस्पष्ट ऑफशाेअर फंड ‘बर्म्युडा ॲण्ड माॅरिशस फंड’मध्ये छुपी भागीदारी हाेती. या फंडातील ८,७२,७६२ डाॅलर एवढी रक्कम विनाेद अदानी यांनी वापरल्याचा दावा आहे. ‘आयआयएफएल’ प्रकटीकरणातून बुच दाम्पत्याची एकूण संपत्ती १० दशलक्ष डाॅलर असल्याचे स्पष्ट हाेते. यापूर्वीही हिंडेनबर्गने अदानी समूहावर आराेप केले. मात्र, अदानी समूहाने ते फेटाळून लावले हाेते.

काय आहे दावा?

  • सिंगापूर येथील तेथील अगाेरा पार्टनर्स नावाने एका कन्सल्टिंग फर्ममध्ये माधवी यांचा १०० टक्के वाटा हाेता. 
  • सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरित केले. 

Web Title: Shocking Sebi Chairman Madhavi Puri Buch Partners in 'That' Fund Hindenburg claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SEBIसेबी