धक्कादायक! अमेरिकेत भारतीय कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; घटनेने न्यू जर्सीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 12:16 PM2023-10-07T12:16:35+5:302023-10-07T12:19:04+5:30
प्लेन्सबोरो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय तेजप्रताप सिंह ४२ वर्षीय सोनल परिहार आपल्या दोन मुलांसह न्यू जर्सी येथे राहत होते.
अमेरिकेच्या न्यू जर्सी येथील मूळ भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयित मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश असून या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी हत्या कि आत्महत्या याचा तपास सुरू केला असून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच, अनुषंगाने प्लेन्सबेरो पोलीस तपास करत आहेत.
प्लेन्सबोरो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय तेजप्रताप सिंह ४२ वर्षीय सोनल परिहार आपल्या दोन मुलांसह न्यू जर्सी येथे राहत होते. मात्र, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजत पती-पत्नीसह त्यांची अनुक्रमे १० आणि ६ वर्षांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. मिडलसेक्स काउंटी अभियोजक योलान्डा सिस्कोन आणि प्लेन्सबोरोचे पोलीस प्रमुख इमोन ब्लैंचर्ड यांनी या सामूहिक हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे म्हटले.
४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ९११ क्रमांकावरुन पोलीस अधिकाऱ्यांना प्लेन्सबोरो येथील एका घरात तपासासंबंधी कॉल आला होता. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ४ जण मृतावस्थेत दिसून आले. याप्रकरणी, पोलिसांनी मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यास पाठवले असून त्यानंतरच अनेक बाबींची उलगडा होईल, असे म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वसामान्य नागरिकांना कुठलाही धोका नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
प्लेन्सबोरोचे मेयर पीटर कैटू आणि सार्वजनिक सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख इमोन ब्लैंचर्ड यांनी संयुक्तीकपणे बोलताना म्हटले की, या दु:खद घटनेने आम्ही दु:खी आहोत. जे घडलं त्या समजण्यापलिकडचे आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनाही या घटनेने धक्का बसला आहे. तेज प्रताप सिंह आणि सोनल परिहार यांचं कुटुंब आनंदी होतं. सिंह हे समाजातही अधिक सक्रीय होते. दोघेही आयटी आणि एचआर क्षेत्रात काम करत होते. दरम्यान, दोघांनीही २०२८ मध्ये ६ लाख ३५ हजार अमेरिकन डॉलरमध्ये घर खरेदी केलं होतं.