धक्कादायक! नववधुने पतीला मारण्यासाठी दुधात मिसळलं विष, सासरच्या 13 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 10:33 AM2017-10-31T10:33:29+5:302017-10-31T10:34:48+5:30

पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

Shocking Twenty-nine people died of poison and mother-in-law to kill newlyweds | धक्कादायक! नववधुने पतीला मारण्यासाठी दुधात मिसळलं विष, सासरच्या 13 जणांचा मृत्यू

धक्कादायक! नववधुने पतीला मारण्यासाठी दुधात मिसळलं विष, सासरच्या 13 जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळलं. विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या मुजफ्फरगडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहितेने पतीला मारण्यासाठी दुधात विष मिसळलं. या विषारी दुधाची लस्सी प्यायल्याने तिच्या सासरच्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुजफ्फरगडच्या दौलत पौर परिसरात ही घटना घडली आहे. आसिया असं या महिलेचं नाव असून दोन महिन्यांपूर्वी तिचं लग्न जबरदस्तीने केलं होतं. घरच्यांनी मनाविरूद्ध लग्न लावल्याने या मुलीने पतीलाच संपविण्याचा कट रचला. त्यासाठी तिने दुधात विष मिसळलं. 
लग्नापूर्वी घरातून पळून जाण्याचा आसियाचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर लग्न झाल्यावर पतीला मारण्यासाठी तिच्या प्रियकराने तिला विष आणून दिलं होतं, अशी माहिती मुजफ्फरगड पोलिसांनी दिली. पती अमजदला मारण्यासाठी तिने दुधात विष मिसळलं. महिलेने पतीला दूध पिण्यास सांगितलं, पण काही कारणाने तो दूध प्यायला नाही.

त्यानंतर ज्या दुधात विष मिसळलं होतं, त्याची लस्सी बनवण्यात आली. महिलेच्या सासरची लोक विषारी दुधापासून तयार केलेली लस्सी प्यायले. पण या लस्सीमुळे कुटुंबातील 27 जणांना विषबाधा झाली. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू असून 14 जणांवर हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.
दुधात पाल पडल्याने ते विषारी झालं, अशी सगळ्यांची समजूत होती. पण नंतर  आसियाने दुधात विष मिसळल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आसियाच्या कथित प्रियकराला अटक करण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.

Web Title: Shocking Twenty-nine people died of poison and mother-in-law to kill newlyweds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.