Shocking! १६० फूट उंचीवर व्हिडीओ बनवत होती महिला, अचानक पाय घसरला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:36 PM2021-07-24T12:36:19+5:302021-07-24T12:44:18+5:30
टॉवर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिचा आधी मृत्यू झाला होता.
सोशल मीडियावर (Social Media) वर अॅक्टिव राहण्याच्या क्रेझने एका चीनी महिलेचा जीव गेलाय. महिला १६० फूट उंचीवर व्हिडीओ बनवत होती. तेव्हा तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. खाली पडत असताना फोन महिलेच्या हातातच होता. टॉवर क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या महिलेला लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तिचा आधी मृत्यू झाला होता.
‘द सन’ च्या रिपोर्टनुसार, मृत महिला Xiaoqiumei नावाने सोशल मीडियावर अकाऊंट चालवत होती. ज्यावर ती तिच्या डेली लाइफ आणि विशाल क्रेन ऑपरेटींगशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत होती. तिने १ लाख फॉलोअर्सही होते. घटनेवेळी उपस्थित लोकांनी सांगितलं की, मृत महिला १६० फूट उंचीवर तिचा व्हिडीओ बनवत होती. तेव्हाच अचानक खाली पडली. (हे पण वाचा : Shocking! बंजी जम्पिंगची इच्छा पडली महागात, एका चुकीमुळे हवेतच झाला तरूणीचा मृत्यू)
२३ वर्षीय महिला दोन मुलांची आई होती. मंगळवारी सायंकाळी जेव्हा जास्तीत जास्त सहकारी साइटवरून निघून गेले होते तेव्हा Xiaoqiumei लाइव्ह व्हिडीओ बनवण्यासाठी क्रेनवर चढली होती आणि यादरम्यान तिचा पाय घसरला. मात्र, परिवाराला हे मान्य नाही. ते म्हणाले की, त्यांची मुलगी तिच्या कामाबाबत फार गंभीर होती आणि ड्युटी दरम्यान व्हिडीओ बनवू शकत नाही. क्रेनहून उतरताना तिचा पाय घसरला आणि ती खाली पडण्याची शक्यता आहे.
Zhejiang Province च्या Quzhou मध्ये राहणाऱ्या महिलेचं ऑफिस तिच्या घराजवळच होतं. पीडित परिवाराने सांगितलं की, Xiaoqiumei काम करत असताना फोन तिच्या बॅगमध्ये ठेवत होती. त्यामुळे हे शक्य नाही की, व्हिडीओ काढताना ही दुर्घटना झाली असावी. या घटनेमुळे महिलेचे सहकारीही शॉकमध्ये आहेत. त्यांना विश्वास बसत नाहीये की, Xiaoqiumei आता त्यांच्यात नाही.