अमेरिकेत शाळेत गोळीबार,तिघांचा मृत्यू; गोळीबारात शूटरचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 07:59 IST2024-12-17T07:56:25+5:302024-12-17T07:59:10+5:30
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. विस्कॉन्सिनमधील मॅडिसन येथील एका शाळेत गोळीबार झाला असून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत शाळेत गोळीबार,तिघांचा मृत्यू; गोळीबारात शूटरचाही मृत्यू
अमेरिकेत आता पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. विस्कॉन्सिनमधील मॅडिसन येथील एका ख्रिश्चन शाळेत गोळीबाराची घटना समोर आली असून, या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत गोळीबार करणाराही ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात सहा जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्याची ओळख पटवण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. हल्लेखोराने हा गुन्हा का केला हे याची माहिती पोलिस घेत आहेत.
जर्मनीचे चांसलर ओलाफ शोल्ज यांनी विश्वासमत गमावले, देशातील आघाडी सरकार कोसळले
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ॲबडंट लाइफ ख्रिश्चन स्कूलमध्ये सकाळी १०.५७ वाजता गोळीबार झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तेथे अनेक जण जखमी अवस्थेत आढळले. गोळीबाराची घटना घडलेल्या मॅडिसन येथील खासगी शाळेत बालवाडी ते १२वी पर्यंतचे ४०० विद्यार्थी शिकतात.
अमेरिकेत दररोज गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. अमेरिकेतील क्लबमध्ये घुसून गोळीबार झाला होता, तर काही दिवसापूर्वी असाच शाळेत गोळीबार झाला होता.
१८ जुलै २०२२ रोजी अमेरिकेतील इंडियाना येथील ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये गोळीबाराची घटना घडली. सामूहिक गोळीबारात १० लोक गोळीबाराचे बळी ठरले. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला.
११ जुलै २०२२ रोजी कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात एका हाऊस पार्टीदरम्यान हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत एका महिलेसह ५ जणांना गोळ्या लागल्या, त्यापैकी ३ जणांना आपला जीव गमवावा लागला.
🚨 #BREAKING: Four hours after the Wisconsin Christian school shooting, police are still BLATANTLY REFUSING to disclose the “gender” of the shooter
We’re all thinking the same thing, aren’t we? pic.twitter.com/zoBpc26B8s— Nick Sortor (@nicksortor) December 16, 2024