अमेरिका पुन्हा हादरली! म्युझिक कॉन्सर्टमध्ये गोळीबार; पोलिसासह अनेक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:24 AM2022-06-20T09:24:27+5:302022-06-20T09:26:11+5:30
concert juneteenth : गोळीबाराची घटना 14th आणि U Street भागात घडली आहे.
अमेरिका पुन्हा एकदा हादरली असून गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊसपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर हा गोळीबार झाला. यामध्ये एका पोलिसासह अनेक जण जखमी झाले आहे. एका म्युझिक इव्हेंटदरम्यान गोळीबाराची घटना घडली. हा कॉन्सर्ट Juneteenth सेलिब्रेशनसाठी होत होता. गोळीबाराची घटना 14th आणि U Street भागात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात पोलिस कर्मचाऱ्यासह एकूण चार जण जखमी झाले आहेत. ज्यावेळी गोळीबार करण्यात आला, त्यावेळी परिसरात गर्दी होती, त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरात तेथे गोळीबार केला नाही. जखमींमध्ये एका 15 वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
Multiple people shot at including police officer in Washington DC
— ANI Digital (@ani_digital) June 20, 2022
Read @ANI Story | https://t.co/fFTiqQifU5#shooting#Washingtonshootingpic.twitter.com/ovakpUlpwq
दरम्यान, हल्लेखोराची ओळख पटलेली नाही. अमेरिकेत अशा गोळीबाराच्या घटना वाढत आहेत. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. लहान मुले आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी अशा शस्त्रांवर बंदी घातली पाहिजे, असे ते म्हणाले होते. तसेच, येत्या काही दिवसांत ज्यो बायडन हे अमेरिकेतील बंदूक खरेदीचे वय 18 वर्षावरून 21 वर्षांपर्यंत वाढवू शकतात.
4 महिन्यांत 200 हून अधिक घटना
अमेरिकेतील स्वतंत्र डेटा संग्रह करणाऱ्या 'गन व्हॉयलन्स अर्काइव्ह'च्या रिपोर्टनुसार गेल्या 4 महिन्यात 200 हून सामूहिक गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत. 2021 मध्ये 693 सामूहिक गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. 2022 मध्ये आत्तापर्यंत 611 ठिकाणी गोळीबार झाला आहे. तर 2019 मध्ये 417 ठिकाणी या प्रकराच्या घटना घडल्या होत्या.