इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 09:33 AM2021-11-15T09:33:59+5:302021-11-15T09:34:22+5:30

तुरुंगात दोन गट भिडले; १० जण जखमी; शस्त्रे, स्फोटके जप्त

Shooting of prisoners in Ecuador; The bombing killed 52 people | इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

इक्वेडोरमध्ये कैद्यांचा गोळीबार; बॉम्बहल्ल्यात 52 जण ठार

Next
ठळक मुद्देगोळीबार व बॉम्बहल्ल्यात मरण पावलेल्या कैद्यांचे तुरुंगात पडलेले मृतदेह दाखविणाऱ्या व्हिडीओ फिती समाजमाध्यमांवर झळकल्या आहेत. 

क्विटो :  इक्वेडोर या देशातील सर्वात मोठ्या लिटोरल तुरुंगामध्ये कैद्यांच्या दोन गटांनी शनिवारी परस्परांवर केलेला गोळीबार व बॉम्बहल्ल्यांत ५२ जण ठार झाले, तर १० जण जखमी झाले आहेत. या तुरुंगाजवळील गुयाक्विल शहरातल्या रहिवाशांमध्ये या रक्तपातामुळे घबराट निर्माण झाली.  तुरुंगातील रक्षक हिंसाचार रोखण्यास कमी पडू लागल्याने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली व हिंसाचार रोखण्यात आला. अनेक कैद्यांकडून शस्त्रे, बॉम्ब, अन्य स्फोटके जप्त करण्यात आली.

गोळीबार व बॉम्बहल्ल्यात मरण पावलेल्या कैद्यांचे तुरुंगात पडलेले मृतदेह दाखविणाऱ्या व्हिडीओ फिती समाजमाध्यमांवर झळकल्या आहेत. 
अमली पदार्थांचे तस्कर व संघटित गुन्हेगार यांच्याशी सुरक्षा दलांना अधिक मजबुतीने लढा देता यावा यासाठी या देशात राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी ऑक्टोबर महिन्यापासून आणीबाणी पुकारली आहे. नेमके त्याच काळात लिटोरल येथील तुरुंगात कैद्यांच्या दोन गटांमध्ये हा मोठा हिंसाचार झाला.  इक्वेडोरमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांचे अनेक तस्कर शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या टोळ्यांमध्ये तुरुंगातही संघर्ष सुरू असतो. गेल्या सप्टेंबर महिन्यात लिटोरल तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचारात ११८ जण ठार व ७९ जण जखमी झाले होते. त्यावेळी मृतांमधील पाच जणांचा शिरच्छेद करण्यात आला होता. 
एका कैद्याचा भाऊ फ्रान्सिस्का चॅनके यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेला हिंसाचार पाहून हे तुरुंग आहेत की कत्तलखाने असा प्रश्न सर्वांना पडला आहे. इक्वेडोरमधील तुरुंगांच्या सुरक्षेची जबाबदारी आता लष्कराकडे द्यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.

तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी
इक्वेडोरमधील सर्व तुरुंगांमध्ये ४० हजार कैदी आहेत. त्यातील ८,५०० कैदी हे एकट्या लिटोरल तुरुंगामध्ये आहेत. या तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा ५५ टक्के अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. तर लिटोरल तुरुंगात ६२ टक्के अधिक कैदी आहेत.  

गेल्या सप्टेंबर महिन्यात लिटोरल तुरुंगामध्ये झालेल्या हिंसाचारात

Web Title: Shooting of prisoners in Ecuador; The bombing killed 52 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.