शॉपिंग करणारा श्वान
By admin | Published: June 25, 2017 12:21 AM2017-06-25T00:21:31+5:302017-06-25T00:21:31+5:30
अनेक घरांत पाळीव श्वान असतात. लोक त्यांना आपल्या सूचनेप्रमाणे वागायचे शिकवतात. उदाहरणार्थ फेकलेला चेंडू आणणे, हस्तांदोलन करणे इत्यादी
ब्रासिलिया : अनेक घरांत पाळीव श्वान असतात. लोक त्यांना आपल्या सूचनेप्रमाणे वागायचे शिकवतात. उदाहरणार्थ फेकलेला चेंडू आणणे, हस्तांदोलन करणे इत्यादी; परंतु एखादा पाळीव श्वान स्वत:साठी वस्तूंची खरेदीही करतो, असे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ब्राझीलमध्ये असा श्वान आहे. विशेष म्हणजे तो एकटाच खरेदीला जातो. त्याचे खरेदीचे कौशल्य ऐकून तुम्ही चाटच पडाल.
पिटयूको नावाच्या या श्वानाने खाद्यपदार्थांची नावे उत्तमरीत्या आत्मसात केली आहेत. तो एवढा चलाख आहे की, शहरातील एकूण एक दुकान त्याला ठाऊक आहे. त्याला कॅट फूट किंवा बर्ड सील आण म्हणून सांगितले की, तो सरळ स्टोअरमध्ये जाऊन सामान घेऊन येतो. त्याला यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. अॅग्रो पेट पराई नावाच्या एका व्यक्तीने याचा व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांवर शेअर केला असून, त्याला मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.