प्रवासाच्या नियोजनात बदल झाला तर युएसचा व्हिसा रद्द करावा का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 07:00 AM2017-10-30T07:00:00+5:302017-10-30T07:00:00+5:30
बी1/ बी 2 या प्रकारचे व्हिसा पर्यटन, व्यवसाय, व्यापारी परिषदा आणि कौटुंबिक भेटीगाठी अशा विविध कारणांसाठी दिला जातो
प्रश्न - न्यू यॉर्कमध्ये व्यावसायिक कामासाठी उपस्थित राहण्यासाठी नुकताच मला 10 वर्षांसाठीचा व्यावसायिक व्हिसा देण्यात आला आहे. परंतु, माझं ते काम रद्द झालं आहे, तर माझा व्हिसा रद्द करा असं मला यु. एस. कॉन्सुलेटला सांगावं लागेल का?
उत्तर - होय, कॉन्सुलेट व्हिसा रद्द करू शकते. अर्थात, तुमचा व्हिसा रद्दबातल करण्याची तशी आवश्यकता नाहीये. व्हिसाची मुदत संपेपर्यंत तुम्हाला अमेरिकेमध्ये प्रवास करण्यासाठी तो ग्राह्य असतो. बी1/ बी 2 या प्रकारचे व्हिसा पर्यटन, व्यवसाय, व्यापारी परिषदा आणि कौटुंबिक भेटीगाठी अशा विविध कारणांसाठी दिला जातो. काहीवेळा नियोजनात बदल होऊ शकतो हे आम्ही जाणतो. परंतु, एक लक्षात ठेवा नॉन-इमिग्रंट व्हिसा जे कसोटीत उतरतात त्यांना मिळतो. जर बी1 / बी2 या प्रकारच्या व्हिसामागचं मुख्य कारण बदललं असेल, तरी तुम्ही हा व्हिसा भविष्यातील प्रवासासाठी वापरू शकता, अर्थात, व्हिसाच्या प्रकारातच तुमचा प्रवास मोडत असेल तर!
तरीही तुम्हाला व्हिसा रद्द करायचाच असेल तर support-india@ustraveldocs.com इथं आपलं म्हणणं मेल करावं. व्हिसासाठी भरलेलं शुल्क परत मिळणार नाही हे लक्षात असू द्या. एकदा रद्द केलेला व्हिसा पुन्हा पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जुना व्हिसा रद्द केलात, तर भविष्यातल्या प्रवासासाठी तुम्हाला पुन्हा नव्याने व्हिसासाठी अर्ज करावा लागेल आणि सगळी प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.