सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ

By admin | Published: October 1, 2016 12:35 PM2016-10-01T12:35:16+5:302016-10-01T12:35:16+5:30

भारताने घरात घुसून हल्ला केल्यानंतर जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे

Show us what are the surgical strikes, Hafiz Saeed, Oakley Garland | सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ

सर्जिकल स्ट्राईक काय असतात भारताला दाखवू, हाफिज सईदने ओकली गरळ

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 1 - भारताने घरात घुसून हल्ला केल्यानंतर जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदने पुन्हा एकदा गरळ ओकली आहे. सर्जिकल स्ट्राईक काय असतात, हे आम्ही भारताला दाखवू अशी धमकीच हाफिज सईदने दिली आहे. 
 
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
(भारत आता पाकसोबत हवाई संपर्कही तोडणार?)
 
शुक्रवारी फैसलाबादमध्ये हाफिज सईदच्या सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना हाफिजने भारताला धमकी देताना भारतीय माध्यमांनाही लक्ष केलं. 'उरी हल्ल्यानंतर भारतीय माध्यमांनी केवळ त्यांचे 20च जवान मारले गेल्याचा दावा केला तो खोटा आहे. या हल्ल्यात 177 हून अधिक भारतीय ठार झाले होते. आमच्यावर सूड उगवण्यासाठी एक झलक दाखवण्यात आली. यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक कशाला म्हणतात, हे भारताला दाखवून देऊ', असं हाफिज सईद बोलला आहे. हाफिज सईदने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनाही लक्ष्य केलं.
 
('उरी' हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आधीच हलवले दहशतवाद्यांचे तळ)
(उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांनी दिला नकार - सुभाषचंद्र गोयल)
 
उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची विविध मार्गांनी कोंडी केल्यानंतर भारताने २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. हेलिकॉप्टरच्या मदतीने लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे सात लाँच पॅड उद्ध्वस्त केले. त्यात पाकिस्तानचे 9 सैनिकही ठार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पाकिस्तानने दोनच सैनिक मारले गेल्याचे म्हटले आहे.
 
(उरी हल्ल्याचा बदला पूर्ण तयारीनिशीच)
 
जम्मू-काश्मीरमधील  'उरी' येथील लष्करी तळावर हशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून कठोर कारवाई होण्याच्या भीतीमुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे १६ते १७ तळ सुरक्षित स्थळी हलवले होते, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.  ' भारताकडून जोरदार हल्ला होण्याची कुणकुण लागताच लष्कर व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने 'लष्कर -ए-तोयब', ' जैश-ए -मुहम्मद' आणि 'हिजबुल मुजाहिद्दी'नचे दहशतवादी सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. मनसेहरा व मुझफ्फराबाद येथून कार्यरत असलेले ४ दहशतवादी तळही हलवण्यात आल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. 
 

Web Title: Show us what are the surgical strikes, Hafiz Saeed, Oakley Garland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.