भारतीय वंशाच्या सिद्धार्थ मुखर्जी, राज चेट्टी यांचा अमेरिकेत गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:36 AM2020-07-03T03:36:25+5:302020-07-03T03:36:37+5:30
पुलित्झर पुरस्काराने सन्मानित लेखक व कर्करोग तज्ज्ञ सिद्धार्थ मुखर्जी व हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक राज चेट्टी यांचा त्यात समावेश आहे
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रतिष्ठित अमेरिकन संस्था कार्नेजी कार्पोरेशन आॅफ न्यूयॉर्कने ३८ स्थलांतरितांना विशेष कामगिरीबद्दल सन्मानीत केले असून त्यात दोन भारतीय-अमेरिकनांचा समावेश आहे.
पुलित्झर पुरस्काराने सन्मानित लेखक व कर्करोग तज्ज्ञ सिद्धार्थ मुखर्जी व हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक राज चेट्टी यांचा त्यात समावेश आहे. या दोघांनी कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या आरोग्य संकटाची तीव्रता कमी करण्यास प्रयत्न केले आहेत. ‘२०२० ग्रेट इमिग्रंटस’ असा त्यांचा सन्मान झाल्याचे बुधवारी कार्पोरेशनने निवेदनात म्हटले. चार जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन आहे. ‘‘आमच्यासाठी तसेच अनेक स्थलांतरितांसाठी अमेरिका एकच आहे. तुम्ही जर कठोर परिश्रम करता आहात तर तुम्ही पुढे जाल. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. आकाश ही तुमची मर्यादा आहे,’’ असे राज चेट्टी यांनी हार्वर्ड गॅझेटचा हवाला देऊन म्हटले आहे.