पाकिस्तानातील सिद्धिविनायक मंदिरात तोडफोड; परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:36 AM2021-08-05T07:36:48+5:302021-08-05T07:40:10+5:30

Pakistan Temple vandalized : पाकिस्तानातील भोंग शरीफ गावात आहे सिद्धिविनायक मंदिर. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, परिसरात तणावाचं वातावरण.

siddhi vinayak temple pakistan punjab provenance vandalized viral video pm impran khan took note | पाकिस्तानातील सिद्धिविनायक मंदिरात तोडफोड; परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात

पाकिस्तानातील सिद्धिविनायक मंदिरात तोडफोड; परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात

googlenewsNext
ठळक मुद्देपाकिस्तानातील भोंग शरीफ गावात आहे सिद्धिविनायक मंदिर.सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, परिसरात तणावाचं वातावरण.

पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिराला निशाणा बनवण्यात आलं आहे. पंजाब प्रांतातील सादिकाबाद जिल्ह्यातील भोंग शरीफ गावात असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. 

व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात काही लोकं मंदिराच्या आत लाठी-काठ्या घेऊन शिरत आहेत. तसंच त्यानंतर मंदिरात तोडफोड सुरू करतानाही यात दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मंदिरातील मुर्तींसह अन्य काही भागांचही नुकसान करताना लोक दिसत आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. तसंच पोलीस या घटनेचा तपासही करत आहेत. 


यादरम्यान, पाकिस्तानचेपंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक डॉ. शहबाज गिल यांनी ट्वीट करत ही घटना अतिशय दु:खद आणि खेदजनक असल्याचं म्हटलं. पंतप्रधान कार्यालयानं या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. पाकिस्तानचं संविधान अल्पसंख्यांकांना त्यांची पूजा स्वतंत्ररित्या करण्याचं स्वातंत्र्य आणि सुरक्षा देत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

खेदजनक कृत्य : खा. रमेश वंकनानी
या प्रकरणी इम्रान खान यांच्या सत्ताधारी पक्षाचे खासदार रमेश वंकवानी यांनी भोंग शरीफ या ठिकाणी झालेल्या मंदिराच्या तोडफोडीचं कृत्य हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया दिली. दोषींना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या मुख्य न्यायाधीशांकडेही दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  

Web Title: siddhi vinayak temple pakistan punjab provenance vandalized viral video pm impran khan took note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.