पाकचे राजकीय संकट मावळण्याची चिन्हे
By admin | Published: September 5, 2014 02:00 AM2014-09-05T02:00:58+5:302014-09-05T02:00:58+5:30
सरकार व निदर्शकांदरम्यान चर्चेद्वारे तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना गती मिळाल्यामुळे पाकिस्तानातील राजकीय संकट संपुष्टात येण्याची शक्यता आता दिसत आहे.
Next
इस्लामाबाद : सरकार व निदर्शकांदरम्यान चर्चेद्वारे तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना गती मिळाल्यामुळे पाकिस्तानातील राजकीय संकट संपुष्टात येण्याची शक्यता आता दिसत आहे.
इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ व मौलवी ताहिर उल कादरी यांच्या पाकिस्तान अवामी तहरीक संघटनेची सरकारसोबत बुधवारी रात्री चर्चा झाली. निदर्शक आणि सरकारमध्ये दोन बैठका झाल्या.
पहिली बैठक सरकारी समिती आणि तहरीक-ए- इन्साफच्या प्रतिनिधींमध्ये झाली, तर दुस:या बैठकीत सरकारी समिती कादरी यांचे प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या जिरगाने सहभाग घेतला.
चर्चा कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचली नसली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चेतून काही सकारात्मक निष्कर्ष निघाले असल्याचे सांगितले. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आणि जिरगाचे सदस्य रहमान मलिक यांनी बैठकीनंतर ट¦ीट केले की, दिवस खूपच मोठा होता. सरकार आणि इम्रान खान-कादरी यांच्यातील कोंडी फुटेल.