स्पेनमधील अशीही परंपरा

By admin | Published: April 11, 2017 12:47 AM2017-04-11T00:47:36+5:302017-04-11T00:47:36+5:30

हे छायाचित्र पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण, ही आहे स्पेनमधील परंपरा. याला डेविल्स जंप असेही म्हटले जाते. लहान मुलांना जमिनीवर झोपविले जाते

Similar traditions in Spain | स्पेनमधील अशीही परंपरा

स्पेनमधील अशीही परंपरा

Next

माद्रिद : हे छायाचित्र पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण, ही आहे स्पेनमधील परंपरा. याला डेविल्स जंप असेही म्हटले जाते. लहान मुलांना जमिनीवर झोपविले जाते आणि त्यांच्या अंगावरुन उडी मारली जाते. देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा
केला जातो. यासाठी एक विशिष्ट जागा निवडली जाते. त्यानंतर खास पोषाखातील व्यक्ती येतात आणि
या लहान मुलांच्या अंगावरुन उडी मारतात. असे अनेक लोक अंगावरुन उडी मारुन गेल्यानंतर हा खेळ संपतो. यामुळे पापांची शुद्धी होते असेही
मानले जाते. नवजात बालकाच्या आजूबाजूच्या नकारात्मक उर्जेचा
नाश होतो असाही समज आहे. इ.स. १६२० पासून ही परंपरा सुरु आहे. याची सुरुवात नेमकी कशी
झाली याबाबत मत मतांतरे
आहेत. पण, या परंपरेवर अनेकांची श्रद्धा आहे.

Web Title: Similar traditions in Spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.