सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांचं निधन
By admin | Published: March 23, 2015 04:15 AM2015-03-23T04:15:57+5:302015-03-23T11:31:18+5:30
सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांचं सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांचं सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर फेब्रुवारी महिन्यापासून उपचार करण्यात येत होते परंतू सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिंगापूर शहराला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देण्यात आणि त्या शहराची जडणघडण करण्यात ली कुआन यांचा फार मोठा वाटा मानला जातोय. ली कुआन यू यांनी सिंगापूरचे पहिले व सलग ३१ वर्ष पंतप्रधानपद भूषविले आहे. ली कुआन यू यांचा मुलगा लि सिएन लूंग सध्या सिंगापूरचे पंतप्रधानपदावर विराजमान असून ली कुआन यांचं निधन झाल्याची माहिती पंतप्रधानांचे सचिव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, ली कुआन यू यांचे सिंगापूरमधील जनरल हॉस्पिटलमध्ये स्थानिक वेळेनुसार ३ वाजून १८ मिनिटांनी निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे ली कुआन यांना श्रद्धांजली वाहिली.