जेम्स बॉन्ड साकारणारे सर रॉजर मूर काळाच्या पडद्याआड !
By Admin | Published: May 23, 2017 07:27 PM2017-05-23T19:27:03+5:302017-05-23T20:36:43+5:30
हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर यांचं निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर यांचं निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
सर रॉजर मूर यांचं कॅन्सरच्या दीर्घ आजाराने स्वित्झर्लंडमध्ये निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
हॉलिवूडमध्ये त्यांची जेम्स बॉन्ड म्हणून ओळख होती. त्यांनी 1973 आणि 1985 मध्ये एमआय 6 एजेन्ट जेम्स बॉन्ड या सात चित्रपटांच्या सिरीजमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती. या व्यतिरीक्त त्यांनी "दि सेंट" या टीव्ही सिरीयलमध्येही काम केले होते. यामधील सायमन टेंपलर ही त्यांची व्यक्तिरेखा आजही त्यांच्या चाहत्यांच्या आठवणीत आहे. याचबरोबर त्यांना सामजिक कार्याबद्दल आणि अभियन क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. तसेच, त्यांना सामाजिक कार्यासाठी "नाईटहुड"ची उपाधी देण्यात आली होती.
14 ऑक्टोबर 1927 साली रॉजर मूर यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता. हॉलिवूडमध्ये अभिनय करण्याआधी त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1950 साली मॉडेल म्हणून केली.
With the heaviest of hearts, we must share the awful news that our father, Sir Roger Moore, passed away today. We are all devastated. pic.twitter.com/6dhiA6dnVg
— Sir Roger Moore (@sirrogermoore) May 23, 2017