सहा मुत्सद्यांनी पाक सोडले
By admin | Published: November 11, 2016 04:29 AM2016-11-11T04:29:58+5:302016-11-11T04:29:58+5:30
भारतीय उच्चायुक्तालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाकिस्तान सोडले. त्यामुळे पाकच्या हेरगिरीच्या आरोपानंतर तेथून बाहेर पडणाऱ्या भारतीय मुत्सद्यांची संख्या सहा झाली आहे.
इस्लामाबाद : भारतीय उच्चायुक्तालयाच्या तीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाकिस्तान सोडले. त्यामुळे पाकच्या हेरगिरीच्या आरोपानंतर तेथून बाहेर पडणाऱ्या भारतीय मुत्सद्यांची संख्या सहा झाली आहे. पाकने भारताचे आठ मुत्सद्यी भारतीय गुप्तचर संघटनेचे सदस्य असल्याचा आरोप केला होता.
पाकिस्तानातील विध्वंसक कारवायांत सहभागी आढळलेल्या आठ भारतीय मुत्सद्यांपैकी सहा मुत्सद्दी पाकिस्तानातून बाहेर पडले. तथापि, या अधिकाऱ्यांची नावे त्यांनी उघड केली नाहीत. तीन भारतीय अधिकाऱ्यांनी आज पहाटे पाकिस्तान सोडले. ते इंटेलिजन्स ब्युरोसाठी काम करीत असल्याचा आरोप होता.
गेल्या महिन्यात भारताने पाकचे हेरगिरी जाळे उद्ध्वस्त करीत पाक उच्चायुक्तालयाचा अधिकारी मेहमूद अख्तरची चौकशी केली होती. अख्तर हेरगिरीत गुंतल्याचे उघड झाल्यामुळे भारताने त्याला देश सोडून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर पाकने प्रत्युत्तर म्हणून भारतीय मुत्सद्दी सुरजितसिंग यांना देश सोडून जाण्यास सांगितले होते. (वृत्तसंस्था)