केनियाच्या नॅशनल पार्कमधून सहा सिंहांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2016 05:04 PM2016-02-19T17:04:54+5:302016-02-19T17:08:25+5:30

केनियाच्या नैरोबी येथे असलेल्या नॅशनल पार्कमधून सहा सिंहांनी पलायन केल्याचे वृत्त आहे. नैरोबी ही केनियाची सर्वाधिक लोकसंख्या असलेली राजधानी असून या ठिकाणी

Six lions escape from Kenya's National Park | केनियाच्या नॅशनल पार्कमधून सहा सिंहांचे पलायन

केनियाच्या नॅशनल पार्कमधून सहा सिंहांचे पलायन

Next
ऑनलाइन लोकमत
नैरोबी, दि. १९ - केनियाच्या नैरोबी येथे असलेल्या नॅशनल पार्कमधून सहा सिंहांनी पलायन केल्याचे वृत्त आहे. 
नैरोबी ही केनियाची सर्वाधिक लोकसंख्या असलेली राजधानी असून या ठिकाणी देशातील सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. यामध्ये अनेक प्राण्यांचा समावेश आहे. मात्र याच पार्कमधून सहा सिंहांनी पलायन केले असून लोकांच्या वस्तीत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या सिंहांचा शोध येथील आर्मी रेंजर्स आणि केनिया वाईल्डलाईफ सर्व्हिसचे अधिकारी घेत आहेत. आफ्रिका खंडातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असलेला किबेरा जिल्हा नैरोबीच्या बाजूला आहे.  त्यामुळे या जिल्ह्यात सुद्धा सिंह जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
जंगली प्राण्यांपैकी सिंह अपायकारक प्राणी असून ज्या परिसरात एखादा सिंह आल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न लोकांनी करु नये, असे आवाहान केनिया वाईल्डलाईफ सर्व्हिसचे प्रवक्ते पॉल उदोतो यांनी केले आहे. तसेच, नैरोबीच्या लंगाटा परिसरात दोन सिंह शेवटचे दिसले आहेत. आमचे अधिकारी आणि आर्मी रेंजर्सचे जवान त्यांचा शोध घेत आहेत. याचबरोबर नागरिकांनी सिंह दिसल्यास केनिया वाईल्डलाईफ सर्व्हिसला संपर्क करावे, असेही पॉल उदोतो म्हणाले. 
 

Web Title: Six lions escape from Kenya's National Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.