जबरदस्तीने शाळेत पाठवल्याने गोळीबार; अमेरिकेतील शाळेत तीन विद्यार्थ्यांसह सहाजणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:26 AM2023-03-29T09:26:25+5:302023-03-29T09:26:34+5:30

ऑड्रे सकाळी साडेदहा वाजता दोन रायफल व एक हॅण्डगन घेऊन ‘द कॉव्हेंट स्कूल’ या शाळेत पोहोचला व त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली.

Six people died, including three students, at a US school | जबरदस्तीने शाळेत पाठवल्याने गोळीबार; अमेरिकेतील शाळेत तीन विद्यार्थ्यांसह सहाजणांचा मृत्यू

जबरदस्तीने शाळेत पाठवल्याने गोळीबार; अमेरिकेतील शाळेत तीन विद्यार्थ्यांसह सहाजणांचा मृत्यू

googlenewsNext

नॅशविले : अमेरिकेतील नॅशविले येथील शाळेत एका तृतीयपंथीने केलेल्या गोळीबारात तीन विद्यार्थ्यांसह सहाजणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केले असून, ऑड्रे हेल असे त्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

ऑड्रे सकाळी साडेदहा वाजता दोन रायफल व एक हॅण्डगन घेऊन ‘द कॉव्हेंट स्कूल’ या शाळेत पोहोचला व त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस शाळेत पोहोचले व १५ मिनिटांत त्यांनी ऑड्रेला ठार केले. ऑड्रे (२८) याच शाळेचा माजी विद्यार्थी होता. हल्ल्याचे कारण विचारले असता नॅशविले पोलिस दलाचे प्रवक्ते डॉन एरॉन म्हणाले की, बळजबरी ख्रिश्चन शाळेत पाठवल्याचा त्याला राग होता. पोलिसांना ऑड्रेकडे शाळेचे नकाशे सापडले आहेत. तो अनेक दिवसांपासून शाळेची रेकी करत असल्याचे 
आढळून आले. 

Web Title: Six people died, including three students, at a US school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.