उकाड्याने हैराण पुरुष स्कर्ट घालून उतरले रस्त्यावर
By admin | Published: June 22, 2017 02:21 PM2017-06-22T14:21:49+5:302017-06-22T14:22:31+5:30
फ्रान्समधील नोट प्रांतमधील नाराज बसचालक चक्क स्कर्ट घालून कामावर जात आहेत
Next
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 22 - संपुर्ण युरोप सध्या गर्मीमुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीतही काही कार्यालयांनी पुरुष कर्मचा-यांनी पँट घालण्याची सक्ती केली आहे. इतक्या गर्मीत शॉर्ट्स घालण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर्मचारी करत आहे. मात्र कंपनी याकरिता नकार देत आहे. आपली मागणी पुर्ण करण्यासाठी त्रस्त पुरुष कर्मचा-यांनी अनोखी कल्पना अंमलात आणली. फ्रान्समधील नोट प्रांतमधील नाराज बसचालक चक्क स्कर्ट घालून कामावर जात आहेत. आपल्यासोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोपही कर्मचारी करत आहेत. महिलांना स्कर्ट घालून ऑफिसला येण्याची परवानगी आहे, मात्र आम्हाला शॉर्ट्स घालण्यावर बंदी आहे असा आरोप कर्मचारी करत आहेत.
प्रेस ओशनने दिलेल्या वृत्तानुसार, फ्रान्सच्या कर्मचारी नियमांमध्ये शॉर्ट्सवर बंदी घातलेली नाही, मात्र शहरात ज्या कंपनीच्या बसेस चालू आहेत त्यांना चालकांनी शॉर्ट्स घालणं योग्य वाटत नाही. मंगळवारी कंपनीच्या या निर्णयाचा विरोध करत चालक स्कर्ट घालून कामावर पोहोचले. चालकांचं म्हणणं आहे की, "असंही आम्ही ड्रायव्हर सीटवर बसल्यानंतर प्रवाशांना पाहता येत नाही".
एका बसचालकाने स्थानिक न्यूज वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, ""आमचा युनिफॉर्म गर्मीमध्ये घालण्यासाठी अनुकूल नाही. या भयंकर गर्मीतही आम्हाला पँट घालण्याची सक्ती केली जात आहे. कंपनीत महिलांच्या स्कर्ट घालण्यावर कोणतीच बंदी नाही. म्हणूनच मग आम्ही स्कर्ट घालून ऑफिसला आलो आहोत"". पुरुष चालक भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत आहेत.
Même ce midi lors du journal de @pernautjp sur @TF1 ils ont parlé de l"action du @CfdtSemitan qui a eu lieu sur le @reseau_tan ;) pic.twitter.com/GjpZcscRCJ
— Laurent Fournel (@LaurentFournel) June 21, 2017
""गर्मीमुळे तापमान 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. बसमध्ये एअर कंडिशन नसल्याने एवढी गर्मी सहन करण्यापलीकडे आहे", असं एका चालकाने सांगितलं आहे. 2003 प्रमाणे यावेळीही गरम हवेचा वेग असेल अशी चेतावणी हवामान विभागाने दिली आहे. 2003 रोजी फ्रान्समध्ये 15 हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये वयस्कर लोकांचा आकडा जास्त होता.
ब्रिटनमधील जो नावाच्या तरुणाने आपण शॉर्ट्स घालून ऑफिसला गेल्यानंतर घरी परत पाठवण्यात आल्याची तक्रार केली आहे. निषेधासाठी त्याने गुलाबी रंगाचा ड्रेस खरेदी केला आणि तो घालून ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला शॉर्ट्स घालण्याची परवानगी असल्याचं सांगण्यात आलं. त्याला पुन्हा घरी जाऊन कपडे बदलून येण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र त्याने नकार देत त्याच कपड्यांवर दिवसभर ऑफिसमध्ये काम केलं.
What looks better pic.twitter.com/aj7S4sPrtJ
— joey (@jBarge_) June 19, 2017