अमेरिकेत आढळून आलेला 'झोंबी ड्रग' आहे तरी काय? 'ते' व्हिडिओ ठरताहेत खरे! जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:34 AM2023-02-23T10:34:23+5:302023-02-23T10:35:36+5:30
अमेरिकेतील रस्त्यावर गेल्या वर्षी व्हायरल झालेले माणसांच्या विचित्र हालचाली आणि वागणुकीच्या त्या व्हिडिओंमागचं सत्य अखेर समोर आलं आहे.
अमेरिकेतील रस्त्यावर गेल्या वर्षी व्हायरल झालेले माणसांच्या विचित्र हालचाली आणि वागणुकीच्या त्या व्हिडिओंमागचं सत्य अखेर समोर आलं आहे. माणसं अगदी 'झोंबी' सारखे वागत असतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर झोंबी व्हायरस नावाचा प्रसार झाल्याच्या बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या. पण अनेकांनी व्यक्त केलेलं भाकित अखेर ठरलं आहे आणि एका ड्रगमुळे माणसं अशी वागत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
Xylazine, ज्याला 'tranq','tranq dope' आणि 'zombie drug' असेही म्हणतात, हे एक नवं ड्रग आहे ज्याचा घातक परिणाम होत आहे. या ड्रगमध्ये उपशामक सारखी लक्षणे आहेत. ज्यामुळे अत्यंत निद्रानाश, श्वासोच्छवासातील उदासीनता हे या ड्रगच्या वापराचं वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे लोकांना उभं देखील राहता येत नाही, असं व्हिडिओतून दिसून येतं आहे. पण त्याहूनही चिंताजनक गोष्ट म्हणजे या ड्रगचे प्रत्यक्षात खरंच 'झोंबी' सारखे परिणाम आहेत.
ड्रग घेणाऱ्यांच्या त्वचेवर जखमांसारखे व्रण दिसण्यास सुरुवात होते. ज्या वेगानं पसरू शकतात. पुढे याचा त्वचेच्या अल्सरपासून सुरुवात होते आणि त्वचा मृत होऊ जाते. ज्याला एस्कार असं म्हणतात आणि उपचार न केल्यास त्वचेचं विच्छेदन होऊन खड्डे पडण्यास सुरुवात होऊ शकते.
Brooo, what’s happening in the USA🙆🏽♂️💀? pic.twitter.com/hUJCjZ5Xlx
— Oyindamola🙄 (@dammiedammie35) December 6, 2022
हेरॉईनचा प्रभाव शमवण्यासाठी या नॉन-ओपिओइड ड्रगचा सर्वप्रथम वापर केला गेला होता. पण याच्या अगदी लहान डोसमध्येही घातकपणा असल्याचं आढळून आलं आहे. याचे विपरीत परिणाम मनुष्याच्या शरीरावर होतात असे दिसून आलं आहे.
"झोंबी ड्रग" ची प्रमुख समस्या अशी आहे की जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केलं तर त्याहून बाहेर पडणं कठीण आहे. ओव्हरडोज रिव्हर्सल उपचारात सामील असेलल्या नॅलोक्सोन किंवा नार्कनला देखील असे लोक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळेच Xylazine हे घातक ठरते.
Xylazine ड्रग सर्वप्रथम फिलाडेल्फियामध्ये आढळून आला. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को आणि लॉस एंजेलिस येथेही हे ड्रग घेतलं जात असल्याचं दिसून आलं आहे. झोंबी ड्रगचा इतर पदार्थांमध्ये प्रवेश केला तर ओव्हरडोजच्या प्रकरणांमध्ये आणखी एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
"मी सकाळी रडत उठले कारण माझे हात जणू मृत पावत होते", असं ट्रेसी मॅककॅन हिनं न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. ट्रेसीनं हिला याच ड्रगचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. जोपर्यंत या नवीन धोक्याला आळा बसत नाही तोपर्यंत यूएसए मधील रस्त्यावर असे झोंबी सदृश लोक दिसत राहतील.