चपलांची जागा घराबाहेरच! नव्या रिसर्चमधून संशोधकांनी दिला महत्त्वाचा सल्ला, सांगितलं असं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 08:28 PM2022-03-17T20:28:42+5:302022-03-17T20:29:02+5:30

चपला ह्या घराबाहेरच ठेवल्या पाहिजेत, असा आपल्याकडच्या जुन्याजाणत्यांचा आग्रह असतो. मात्र आजच्या बदललेल्या काळात ही बाब मागासलेपणाची वाटते. मात्र चपला ह्या घराबाहेर ठेवणेच आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे.

Slipper place outside the house! From the new research, the researchers gave important advice, because ... | चपलांची जागा घराबाहेरच! नव्या रिसर्चमधून संशोधकांनी दिला महत्त्वाचा सल्ला, सांगितलं असं कारण...

चपलांची जागा घराबाहेरच! नव्या रिसर्चमधून संशोधकांनी दिला महत्त्वाचा सल्ला, सांगितलं असं कारण...

googlenewsNext

न्यूयॉर्क - चपला ह्या घराबाहेरच ठेवल्या पाहिजेत, असा आपल्याकडच्या जुन्याजाणत्यांचा आग्रह असतो. मात्र आजच्या बदललेल्या काळात ही बाब मागासलेपणाची वाटते. मात्र चपला ह्या घराबाहेर ठेवणेच आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे. चपलांमधून धूळ, विविध प्रकारचे जीवाणू विषाणू हे घरात प्रवेश करतात. त्यामुळे चपला घरात आणू नयेत. विज्ञानसुद्धा चपला घराबाहेर ठेवण्याचा पुरस्कार करतं, असं या संशोधनात म्हटलं आहे.

एका संस्थेने केलेल्या संशोधनानुसार चपलांवरील घाण ही दरवाजाच्या बाहेर ठेवणेच सर्वात चांगले असते. लोक आपला ९० टक्के वेळ हा घरामध्येच घालवतात. त्यामुळे घरामध्ये चपला घालण्याचा किंवा न घालण्याचा प्रश्न हा सामान्य प्रश्न नाही आहे. सर्वसाधारणपणे माती, हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणीय सार्वजनिक आरोग्याच्या जोखमींकडे बाहेरील वातावरणाकडे मुख्य लक्ष असते. मात्र इनडोअर गुणवत्तेबाबातही आता ओढा दिसून येत आहे.

तुमच्या घरांमध्ये जे पदार्थ जमा होत आहेत. त्यामध्ये केवळ लोकांनी आणलेली धूळ आणि घाण किंवा पाळीव प्राण्यांचे घळलेले केसच नसतात. तर यातील जवळपास एक तृतियांश भाग हा बाहेरून येतो. तो हवेसोबत येतो किंवा तुमच्या चपलांसोबत येतो. चपला आणि फरशीवर असलेले काही सुक्ष्मजीव हे औषध प्रतिरोधक रोगजनक आहेत. ज्यामध्ये काही संसर्गजनक जीवाणूंचाही समावेश असतो. त्यांच्यावर उपचार करणे कठीण असते. तसेच डांबरी रता आणि लॉनमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमध्ये कॅन्सरकारल विषारी पदार्थ असतात. ते तुम्हाला तुमच्या चपलांवर लागलेल्या घाणीचे नवे चित्र दाखवू शकतात.

नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखामध्ये घरात चपला घालणे तितकही वाईट नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र संशोधक लेखकाने त्याचा प्रतिवाद करताना सांगितलं की, विज्ञानाभिमुख असणं आणि ई-कोलाय विषाणूसोबत राहणं चांगलं आहे. मात्र सोप्या भाषेत सांगायचं तर विष्ठेशी संबंधित बॅक्टेरिया आहे. तो आपला असो वा आपल्या पाळीव प्राण्याचा जर तो मोठ्या प्रमाणावर त्याच्या संपर्कात आल्यास तो तुम्हाला खूप आजारी पाडू शकतो.  त्याचा सामना करणे सोपे आहे. जर तुमच्याकडे दरवाजाबाहेर आपली चपले काढण्याचा एक सरळ सोपा पर्याय असेल तर चपला घरात का न्यायच्या. पर्यावरणीय आरोग्याच्या दृष्टीने चपलामुक्त घर असण्याचे काहीही नुकसान नाही आहे. आपल्या चपला मुख्य दाराबाहेर ठेवल्यास संभाव्य हानिकारक रोगजंतूही बाहेरच राहतील. कुठल्याही आजारावर उपराच करण्यापेक्षा दरवाजावर चपला काढणे हा सोपा प्रतिबंधात्मक उपाय होऊ शकतो.  

Web Title: Slipper place outside the house! From the new research, the researchers gave important advice, because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.