एक छोटीशी चिप..16 वर्षे गर्भधारणा टाळणारी!

By admin | Published: July 13, 2014 12:47 AM2014-07-13T00:47:21+5:302014-07-13T00:47:21+5:30

‘रिमोट कंट्रोल’ने हवी तेव्हा सुरु किंवा बंद करता येऊ शकणारी एक अद्भुत गर्भनिरोधक चिप अमेरिकेतील वैज्ञानिकांनी विकसित केली आहे.

A small chip. Preventing pregnancy for 13 years! | एक छोटीशी चिप..16 वर्षे गर्भधारणा टाळणारी!

एक छोटीशी चिप..16 वर्षे गर्भधारणा टाळणारी!

Next
वॉशिंग्टन: त्वचेखाली बसवून घेतली की महिलेला नको असलेल्या गर्भधारणोच्या धास्तीपासून तब्बल 16 वर्षे  सुटका देऊ शकणारी आणि ‘रिमोट कंट्रोल’ने हवी तेव्हा सुरु           किंवा बंद करता येऊ शकणारी एक अद्भुत गर्भनिरोधक चिप    अमेरिकेतील वैज्ञानिकांनी विकसित केली आहे.
जे दीर्घकाळ वापरता येईल व हवे तेव्हा सुरु किंवा बंद करता येईल असे महिलांना त्वचेखाली बसवून घेण्याचे गर्भनिरोधक साधन विकसित करण्याचे आव्हान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फौंडेशनने जगभरातील वैज्ञानिकांपुढे ठेवले होते. ते स्वीकारून ‘मॅसेच्युसेट्स इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एमआयटी) अभियंत्यांनी मायक्रोचिपच्या स्वरूपातील हे अदभूत उपकरण विकसित केले आहे. पुढील वर्षी ते अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाकडे ‘प्री क्लिनिकल ट्रायल’साठी सादर केले जाईल व या चाचण्या यशस्वी झाल्या तर वर्ष 2क्18 र्पयत ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकेल.
ही गर्भनिरोधक चिप केवळ 2क्मिमी बाय 2क् मिमी बाय 7 मीमि या आकाराची म्हणजे सर्वसाधारण पोस्टाच्या स्टॅम्प्स्हूनही लहान असेल. तिच्यामध्ये 16 वर्षे पुरु शकेल एवढा ‘लेव्होनॉरजेस्ट्रेल’ या हार्मोनचा साठा असेल. ही चिप रिमोट कंट्रोलने         दररोज सुरु करून 24 तासांसाठी गर्भरोधन होऊ शकेल एवढी हार्मोनची मात्र थेट रक्तात मिसळण्याची सोय होईल.
तंत्रज्ञांच्या म्हणण्यानुसार छोटीशी शस्त्रक्रिया करून ही चिप इच्छुक महिलेच्या दंडाच्या, ओटीपोटाच्या किंवा पाश्र्वभागाच्या त्वचेखाली बसविली जाऊ शकेल. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी इस्पितळात दाखल होण्याची गरज नाही, तसेच शस्त्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. बाह्यरुग्ण विभागातही (ओपीडी) ती सहजपणो केली जाऊ शकेल. चिप काढून टाकण्यासाठीही पुन्हा अशीच छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल.
जिच्या शरीरात अशी चिप बसविली असेल ती महिला या चिपचे नियंत्रण ‘रिमोट कंट्रोल’ने करू       शकेल. म्हणजेच दिवसभर पुरेल एवढे हार्मोन रक्तात मिसळविण्यासाठी ही चिप दररोज उघडणो आणि त्यानंतर          ती बंद करणो हे काम ती स्वत:चे         स्वत: पूर्णपणो खासगीपणो करू   शकेल. 
शिवाय या चिपच्या कामात इतर कोणाला ढवळाढवळ करता येऊ नये किंवा तिचे ‘प्रोग्रॅमिंग’ अन्य कोणाला बदलता येऊ नये यासाठी जिच्या शरीरात ती बसविली आहे तिच्या त्वचेच्या स्पर्शानेच फक्त ‘रिमोट कंट्रोल’ चालेल, अशीही व्यवस्था अभियंत्यांनी केली आहे. 
(वृत्तसंस्था)
 
4शरीरात टोचून घेऊन मर्यादित काळापुरते गर्भ निरोधन करण्याची काही साधने सध्याही बाजारात उपलब्ध आहेत. पण प्रदीर्घ काळाची निश्चिंती हे या नव्या चिपचे खास वैशिष्टय़ ठरेल.
 
4 सर्वसारणपणो महिलेचा प्रजननकाळ 32 वर्षाचा असतो, असे वैद्यकशास्त्र मानते. म्हणजेच ही एक चिप निम्म्या प्रजननकाळासाठी गर्भधारणोच्या धास्तीपासून मुक्ती देणारी असेल. शिवाय बसविण्यास सोपी व वापरण्यास सुलभ हे तिचे आणखी एक वेगळेपण.
 
जादुई तंत्रज्ञान
4या चिपचे तंत्रज्ञान अदभूत आहे.‘लेव्होनॉरजेस्ट्रेल’ हार्मोनच्या या चिपरूपी कुपीला अत्यंत प्रगत अशा टायटॅनियम व प्लॅटिनमचे ‘सील’ बसविलेले असेल. ‘रिमोट कंट्रोल’चे बटण दाबले की चिपमधील बॅटरी सुरु होऊन एक विद्युतप्रवाह अल्पकाळासाठी सुरु होऊन त्याने हे ‘सील’ वितळते. 
 

 

Web Title: A small chip. Preventing pregnancy for 13 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.