फ्लूचा माग काढण्यास आता स्मार्ट फोनची मदत
By admin | Published: August 19, 2015 11:05 PM2015-08-19T23:05:48+5:302015-08-19T23:05:48+5:30
स्मार्ट फोन म्हणजे अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान दुनियेतील परवलीचा शब्द. स्मार्ट फोन जनजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. विविध
वॉशिंग्टन : स्मार्ट फोन म्हणजे अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान दुनियेतील परवलीचा शब्द. स्मार्ट फोन जनजीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. विविध अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हा स्मार्ट फोन आरोग्य आणि जीवनशैलीबाबतच्या उपयुक्त माहितीसह अनेक प्रकारे भरवशाचा मदतनीस ठरला असून सर्दी, शीतज्वराच्या (फ्लू-इन्फ्लूएंझा) साथीचे भाकीत करून आरोग्यरक्षक म्हणूनही तो सहायक होऊ शकतो. महाविद्यालय किंवा विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा या साथरोगांच्या संसर्गापासून बचाव करू शकेल, असे मोबाईल अॅप्लिकेशन युनिव्हर्सिटी आॅफ नॉर्थ कॅरोलिनातील अॅलीसन ऐलो आणि ड्यूक युनिव्हर्सिटीचे सांख्यिकी तज्ज्ञ कॅथरीन हेलर यांनी विकसित केले आहे.
दाट वस्ती, व्यस्त जीवनशैलीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अशा विषाणूंची बाधा होते. अमेरिकेतील १८ दशलक्ष महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी पाचपैकी एकाला फ्लूचा संसर्ग होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या संशोधकांनी या मोबाईल अॅपचा चाचणी निष्कर्ष सिडनीत पार पडलेल्या २१ व्या आंतरराष्ट्रीय ज्ञान-शोध आणि आकडेवारी परिषदेत जाहीर केला आहे. (वृत्तसंस्था)