स्मोकिंग सोडायचयं? मग वापरा हे ब्रेसलेट...!

By admin | Published: April 27, 2016 12:11 PM2016-04-27T12:11:26+5:302016-04-27T12:24:49+5:30

धूम्रपान सोडण्यास मदत करणारे एक ब्रेसलेट तयार करण्यात आले असून ते घातल्यास धुम्रपानावर नियंत्रण ठेवता येईल.

Smoking smoking? Then use this bracelet ...! | स्मोकिंग सोडायचयं? मग वापरा हे ब्रेसलेट...!

स्मोकिंग सोडायचयं? मग वापरा हे ब्रेसलेट...!

Next
>ऑनलाइन लोकमत - 
लंडन, दि. 27 - माणसाला लागलेली एखादी सवय सुटण्यास बराच काळ जातो आणि ती सवय जर वाईट असेल तर मग प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते.. अशीच एक सवय म्हणजे धूम्रपान अर्थात स्मोकिंग.. स्वत:सोबतच इतरांच्या आरोग्यासाठीही अतिशय धोकादायक असलेले धूम्रपान सोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, मात्र त्यात यश मिळतेच असे नाही. आता मात्र 
धुम्रपान सोडण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे आणि तो आहे एक ब्रेसलेट....
 
वाचून आश्चर्य वाटलं ना?? पण हे खरं आहे.  धुम्रपान बंद करण्यासाठी मदत करणारं एक ब्रेसलेट तयार करण्यात आलं असून ते घालून तुम्ही जर धुम्रपान करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला विजेचा धक्का बसेल. हा विजेचा धक्का सौम्य असल्याने त्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होणार नाही. मात्र त्यामुळे धुम्रपानावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असा दावा करण्यात आला आहे.
 
मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत धुम्रपान करताना अनेकदा आपल्याला टोकलं जात. त्यामुळे त्यांच्यासमोर धुम्रपान करणं टाळलं जात. पण एकटे असताना टोकायला कोणीच नसतं, त्यावेळी हे ब्रेसलेट मदत करेल. मात्र त्यासाठी इच्छाशक्ती असणंही तितकच गरजेचं आहे. धुम्रपानासोबतच या ब्रेस्लेटचा वापर गोड खाद्यपदार्थ खाण्यावर, फेसबूक वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठीही करु शकतो.  हे ब्रेसलेट अॅमेझॉनवर विक्रीसाठी ठेवण्यात आले असून अनेकांना ते खरेदीही केली आहे. 
 

Web Title: Smoking smoking? Then use this bracelet ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.